‘महाभारत’ या मालिकेत ‘कृष्णा’ची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज सध्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणीत आले आहेत. त्यांनी पत्नी स्मिता यांच्या विरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली असून, हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नितीश यांनी पत्नीवर खळबळजनक आरोप केले आहेत. पत्नीने आपला मानसिक छळ केल्याचे म्हणत आता त्यांनी गेल्या १३ वर्षांपासून आमच्यात शारीरिक संबंध देखील नसल्याचे म्हटले आहे.
नितीश भारद्वाज आपल्या मुलींच्या कस्टडीसाठी लढाई लढत आहेत. नितीश यांना आपल्याला नोकरी करू द्यायची नव्हती, असा आरोप त्यांची आयएएस पत्नी स्मिता यांनी केला आहे. यावर आता नितीश यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. यावेळी नितीश यांनी अनेक पुरावे दाखवले की, ज्यावेळी स्मिता यांना निलंबित करण्यात आले, तेव्हा त्यांनी पत्नीला नोकरी परत मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. तिने घरी बसावं असं वाटत असतं, तर मी असं का केलं असतं? असा प्रश्न नितीश भारद्वाज यांनी केला.
नितीश भारद्वाज यांनी म्हटले की, त्यांच्या पत्नीने यापूर्वी दोन घटस्फोट घेतले आहेत. २०१६मध्ये ७वा वेतन आयोग लागू केला जाईल, त्यानंतर आपण राजीनामा देणार असल्याचे स्मिताने म्हटले होते. तिला स्वतःला चांगले कौटुंबिक जीवन हवे होते आणि ती सरकारी नोकरीला कंटाळली होती, असे नितीश म्हणाले. मी २०१२मध्ये त्यांच्या जुळ्या मुलींचा जन्म झाला. त्यावेळी पत्नीने हट्ट करून पटवून पुण्यात घर घ्यायला लावले होते. यानंतर स्मिता म्हणाल्या की, जर त्यांनी आयएएसची नोकरी सोडली, तर तिला भविष्यात सुरक्षितता हवी आहे आणि त्यासाठी घर त्यांच्या नावावर झाले पाहिजे. नितीश यांनी पत्नीची ही गोष्ट देखील मान्य केली.
मात्र, यानंतर त्यांच्यात वाद वाढू लागले. नितीश यांनी स्मिता यांच्या पहिल्या पतीची भेट घेतली तेव्हा त्यांना समजले की, स्मिता त्यांना स्त्री-पुरुष लग्न बंधनात राहायचेच नव्हते. यामुळेच त्यांची आधीची दोन्ही लग्न देखील मोडली होती. नितीश यांनी सांगितले की, सातवा वेतन आयोग आल्यानंतर त्यांच्या पत्नीने मी राजीनामा देणार नसल्याचे म्हटले. राजीनामा देण्याच्या बहाण्याने तिने अनेक गोष्टी मान्य करून घेतल्याने कळताच नितीश यांना धक्काच बसला होता. नितीश म्हणाले की, त्यांच्या पत्नीला दरमहा साडेतीन लाख रुपये पगार आहे. तरीही मुलांचा सर्व खर्च ते उचलत आहेत.
नितीश म्हणाले की, ‘गेल्या १३ वर्षांपासून आमच्यात पती पत्नीसारखे नाते नाही. मी जेव्हाही तिला भेटायला जायचो, तेव्हा ती वेगळ्या खोलीत जाऊन झोपायची. मी तिच्या जवळ गेलो तर ती नकार द्यायची. स्मिताला कोणत्याही प्रकारचे नाते नको होते, केवळ माझे पैसे हवे होते. तिने मला केवळ विकी डोनर बनवले आणि मुलांना जन्म दिला आणि विकीला डोनर बनवले.’
संबंधित बातम्या