मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madness Machayenge Actress: कुशल बद्रिकेसोबत ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये धिंगाणा घालणार ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री!

Madness Machayenge Actress: कुशल बद्रिकेसोबत ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये धिंगाणा घालणार ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 06, 2024 02:29 PM IST

Madness Machayenge Marathi Actress: ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके लवकरच एका नव्या हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या शोमध्ये आणखी एका मराठी अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

Madness Machayenge Show
Madness Machayenge Show

Madness Machayenge Marathi Actress: ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके लवकरच एका नव्या हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची सध्या प्रचंड हवा पाहायला मिळत आहे. आता या शोमध्ये आणखी एका मराठी अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्थातच आता हिंदी शोमध्ये देखील मराठी कलाकारांचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता कुशल बद्रिके ही जोडी मिळून आता हिंदी मनोरंजन विश्वात धिंगाणा करणार आहे.

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा विनोदी शो वीकएंडला प्रेक्षकांना हास्याचा डोस देण्यासाठी सज्ज झाला आहे. शो मध्ये या आठवड्यात अरबाज खान आणि सोहेल खान यांचे आगमन होणार आहे. ‘मॅडनेस की मालकिन’ हुमा कुरेशीसोबत ते या शोमध्ये सामील होणार आहेत. यावेळी प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि शोचा होस्ट हर्ष गुजराल मोठ्या भावंडांसोबत राहण्यासाठी काय काय करावे लागते हे अधोरेखित करणारा अॅक्ट सादर करणार आहे. विनोदी कलाकार हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके यांनी आपल्या ‘सायलेंट बायको’ या स्किटद्वारे वैवाहिक जीवनातील चढ उतार विनोदी रीतीने प्रस्तुत करणार आहेत. त्यांच्या या विनोदी बुद्धिमत्तेला खान बंधूंकडून दाद मिळणार आहे.

Allu Arjun Anniversary: माझ्या यशाचं सगळं श्रेय तुलाच! लग्नाच्या वाढदिवशी अल्लू अर्जुनची पत्नीसाठी खास पोस्ट

आनंदी आनंद झालाय!

‘मॅडनेस मचाएंगे’मधील या भूमिकेबद्दल बोलताना हेमांगी कवी म्हणाली की, ‘‘मॅडनेस मचाएंगे-इंडिया को हसाएंगे!’मध्ये सहभागी होणे हा एक आनंद आहे. अशा उत्कृष्ट विनोदवीरांसोबत काम करणे म्हणजे उत्कंठा आणि सर्जनशीलतेच्या अनुभवाला एक अतिरिक्त पदर जोडल्यासारखे आहे. कुशल बद्रिके सोबत विनोदी स्किट करणे म्हणजे हास्याची दंगलच... पती-पत्नीच्या दैनंदिन जीवनातील विनोद आणि त्यातली धमाल सादर करण्यात आम्हाला इतकी मजा आली की, आम्ही एकत्र केलेला वेडेपणा आणि धमाल प्रेक्षक कधी पाहतात, असे मला झाले आहे.’

निखळ हास्याच्या धबधबा!

याबद्दल बोलताना कुशल बद्रिके म्हणाला की, ‘मॅडनेस मचाएंगेच्या लाँचिंगच्या माध्यमातून टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा एकदा खरा विनोद परतला आहे. या शोमध्ये गंमतीजंमती, रोस्ट आणि झकास परफॉर्मन्सेसचा समावेश असेल. यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होईल, यात शंकाच नाही. प्रेक्षकांना निखळ हास्याच्या या धबधब्यात डुंबवत इतर कॉमेडियन्ससोबत काम करण्याच्या संधीकडे मी मोठ्या आशेने पाहत आहे.’

IPL_Entry_Point