मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये गौरव मोरेचा अनोखा प्रयोग, सादर करणार हॉरर अॅक्ट

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये गौरव मोरेचा अनोखा प्रयोग, सादर करणार हॉरर अॅक्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
May 25, 2024 09:22 AM IST

सध्या ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो चर्चेत आहे. या शोमध्ये मराठमोळा विनोदवीर गौरव मोरे सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. आता येत्या भागात गौरव काय सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

madness machayenge india ko hasayenge: गौरव मोरेचे स्कीट
madness machayenge india ko hasayenge: गौरव मोरेचे स्कीट

सोनी वाहिनीवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोने सर्वांची मने जिंकली आहेत. या शोमध्ये सहभागी झालेले मराठमोळे विनोदवीर गौरव मोरे, हेमांगी कवी, कुशल बद्रिके यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गौरव मोरेने तर सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याची क्रेझ देशभरात निर्माण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या एपिसोड तो काय सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.

ट्रेंडिंग न्यूज

जिमी शेरगिल असणार पाहुणा कलाकार

या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये अष्टपैलू अभिनेता जिमी शेरगिलच्या उपस्थितीत राहणार आहे. त्यामुळे शोमधील कलाकार हे जबरदस्त स्कीट सादर करताना दिसणार आहेत. या खास भागात विनोदवीर धमाल गॅग्ज सादर करून एपिसोडची रंगत वाढवताना दिसणार आहेत.
वाचा: 'फॅमिली मॅन ३' सीरिजमध्ये शरद केळकर दिसणार की नाही?, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

गौरव मोरे सादर करणार स्कीट

या भागात गौरव मोरे, स्नेहिल मेहरा दीक्षित आणि इंदर साहनी एक अनोखा ‘हॉरर अॅक्ट’ सादर करणार आहेत आणि अर्थात या भयंकर अॅक्टला हे कलाकार गंमतीशीर विनोदी ट्विस्ट देताना दिसणार आहे. या अॅक्टमध्ये गौरव एक उत्साही आणि प्रेमळ नवरा साकारणार आहे. स्नेहिल त्याच्या पत्नीच्या रूपात दिसणार आहे आणि इंदर एका बदमाश केअरटेकरच्या रूपात दिसणार आहे. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे जोडपे एका हॉटेलमध्ये जाते आणि त्यांच्या लक्षात येते की, ही जागा झपाटलेली आहे. या नवऱ्याला काही अनाकलनीय गोष्टींचा अनुभव येऊ लागतो आणि त्याच वेळी भीतीची भावना वाढू लागते. ते पाहून प्रेक्षकांमध्ये हशा पिकू लागतो! पण ही सगळी भुताटकी म्हणजे त्याच्या बायकोची आणि केअरटेकरची त्यांना तिचा वाढदिवस, तिच्या नवऱ्याच्या नजरेपासून दूर, एकत्र साजरा करता यावा म्हणून संगनमताने केलेली योजना असते.
वाचा: कभी नहीं मारा चौका तो बाद में नहीं मिलेगा मौका; "होय महाराजा"चा मजेशीर ट्रेलर पाहिलात का?

जिमीने केले गौरवचे कौतुक

गौरव मोरे, स्नेहिल मेहरा दीक्षित आणि इंदर साहनी यांनी सादर केलेले स्कीट सर्वांना आवडले आहे. त्यात जिमीला तर खूपट स्कीट आवडले. त्यांचा अॅक्ट पाहून प्रभावित झालेला जिमी शेरगिल म्हणतो, “अप्रतिम! तुझे काम, तुझी ऊर्जा आणि पटकथा सारे काही उत्तम होते.”
वाचा: ‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये महेश मांजरेकर का करणार नाहीत सूत्रसंचालन? समोर आलं मोठं कारण!

टी-२० वर्ल्डकप २०२४