मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गौरव मोरेच्या 'मॅड' अदांवर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फिदा! पाहा रोमँटिक व्हिडीओ

गौरव मोरेच्या 'मॅड' अदांवर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फिदा! पाहा रोमँटिक व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
May 16, 2024 08:34 AM IST

सध्या सोशल मीडियावर गौरव मोरेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबत रोमँटिक होताना दिसत आहे.

गौरव मोरेचा मल्लिका शेरावतसोबत मजेशीर अंदाज
गौरव मोरेचा मल्लिका शेरावतसोबत मजेशीर अंदाज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे गौरव मोरे. त्याने विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात गौरव मोरेची क्रेझ पाहायला मिळते. तो सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. सोशल मीडियावर गौरवचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबत रोमँटिक पण मजेशीर अंदाजात दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून एग्झिट घेत गौरव मोरे सोनी वाहिनीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या शो मध्ये धमाल करताना दिसत आहे. या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी त्याने अभिनेत्री जुही चावलासोबत रोमॅन्स केला होता. आता तो 'मर्डर' चित्रपटातील अभिनेत्री मल्लिका शेरावत सोबत मजामस्ती करताना दिसत आहे. गौरवचे स्कीट पाहून मल्लिका शेरावत देखील चकीत झाली आहे. तिने तोंडभरुन गौरवचे कौतुक केले आहे.
वाचा: मराठमोळ्या सोनालीला पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर करणार होता प्रपोज पण...

काय आहे व्हिडीओ?

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये गौरव मजेशीर अंदाजात बेली डान्स करताना दिसत आहे. तेही मल्लिकाला इंप्रेस करण्यासाठी. मल्लिकाने 'गुरु' चित्रपटातील “माय्या माय्या…” गाण्यावर बेली डान्स केला होता. तिच्या बेली डान्सची सर्वत्र चर्चा झाली होती. आता ती ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात येताच तिला इंप्रेस करण्यासाठी गौरवने बेली डान्स केला आहे.
वाचा: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

मल्लिकाने केले गौरवचे कौतुक

मल्लिकाने गौरवचा बेली डान्स पाहून कौतुक केले आहे. ती म्हणाली, “मी आजवर 'माय्या माय्या…' गाण्यावर अनेकांना डान्स करताना पाहिले आहे. पण हे आतापर्यंतचे सर्वात जबरदस्त व्हर्जन आहे."
वाचा: सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितशी लग्न करण्यास दिला होता नकार, जाणून घ्या काय होते कारण?

‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रमाविषयी

‘मॅडनेस मचाएंगे’ हा एक कॉमेडी शो आहे. या कार्यक्रमात हेमांगी कवी, कुशल बद्रिके आणि गौरव मोरे हे मराठी कलाकार गाजवत असल्याचे दिसत आहे. हा कार्यक्रम शनिवार आणि रविवारी रात्री साडेनऊ वाजता प्रदर्शित होतो.

IPL_Entry_Point