बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यामधील एक सिनेमा म्हणजे 'हम साथ साथ हैं.' हा चित्रपट १९९९मध्ये प्रदर्शित झाला होता. ९०च्या दशकात हा सिनेमा तुफान हिट ठरला होता. या चित्रपटात सलमानसोबत अनेक बडे स्टार्स दिसले होते. सलमान खान, मोहनीश बहल, सैफ अली खान, करिश्मा कपूर, तब्बू, सोनाली बेंद्रे यांसारखे कलाकार दिसले. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी चित्रपटाच्या कास्टिंगशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले, माधुरीला या चित्रपटात काम करायचे होते. पण काही कारणास्तव घेता आले नाही.
सूरज बडजात्याने रेडिओ नशाशी खास बातचीत केली. या मुलाखतीमध्ये सूरज बडजात्याला विचारण्यात आले की, तब्बूला चित्रपटात कास्ट करण्यापूर्वी त्याने माधुरी दीक्षितसह इंडस्ट्रीतील अनेक नायिकांशी संपर्क कसा साधला होता. यावर दिग्दर्शकाने सांगितले की, माधुरीने स्वत: त्याला फोन करून चित्रपटात रस दाखवला. पण माधुरीला कास्ट करणं त्याला सोयीस्कर वाटलं नाही.
सूरज बडजात्या म्हणाला की, "मी तिला (माधुरी दीक्षित) सांगितले होते की मी पुरुषप्रधान चित्रपट बनवत आहे आणि जर मी तुला सलमान खानसोबत कास्ट केले तर तुझी भूमिका खूप छोटी असेल. जर मी तुला मोहनीश बहलसोबत कास्ट केले तर तुला सलमानच्या वहिनीची भूमिका साकारावी लागेल. ती इतकी सुंदर स्त्री आहे, ती म्हणाली की काही फरक पडत नाही. फक्त एकत्र काम करताना आनंद होईल. पण मग मी म्हणालो कि मला आनंद मिळणार नाही."
वाचा: उषा नाडकर्णी की तेजस्वी प्रकाश; सेलिब्रिटी मास्टरशेफ शोमध्ये कोण घेतं सर्वाधिक फी?
सलमान खान आणि माधुरी दीक्षित सूरज बडजात्या यांच्या 'हम आपके हैं कौन' या चित्रपटात दिसले होते. प्रेक्षकांना ते दोघंही खूप आवडले. तब्बूच्या भूमिकेसाठी सलमान खानशी संबंध नसलेल्या चेहऱ्याची गरज होती. म्हणूनच त्याने तब्बूला कास्ट केलं. या चित्रपटात तब्बूने सलमान खानच्या वहिनीची भूमिका साकारली होती. सोनाली बेंद्रेने या चित्रपटात सलमान खानच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. नीलम कोठारी, सतीश शहा आणि आलोक नाथ यांसारखे कलाकारही या चित्रपटात दिसले होते.
संबंधित बातम्या