Madhuri Dixit Viral Dance Video: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित तिच्या डान्सिंग स्टाईलमुळे प्रचंड चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये माधुरीला डान्सिंग क्वीन देखील म्हटले जाते. ती नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि डान्सने सगळ्यांना घायाळ करत असते. आता तिची जाहिरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या जाहिरातीत माधुरी दीक्षितने चक्क ‘लोन डान्स’ केला आहे. अर्थात तिचा हा व्हायरल डान्स एका जाहिरातीतील आहे. मात्र, ही जाहिरात देखील सध्या ट्रेंडिंगमध्ये आली आहे. तुम्ही हा डान्स पाहिलात का?
‘मुथूट फायनान्स’ कंपनीसाठी माधुरी दीक्षित हिने हा डान्स व्हिडीओ चित्रित केला आहे. गोल्ड लोन, आणि इतर पर्सनल फायनान्स करणाऱ्या या कंपनीची जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही या फायनान्स कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. यानंतर तिने या कंपनीसाठी एक जाहिरात शूट केली आहे. यात तिने जाहिरातीच्या बोलांवर मनमोहक नृत्य केलं आहे. तिच्या या डान्सचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षितने सुंदर लाल रंगाचा घागरा स्कर्ट आणि पांढरा शर्ट परिधान केला आहे. गाण्यातून आणि डान्सच्या माध्यमातून ती लोन घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करताना दिसली आहे. यातून तिने कंपनीची जाहिरात तर केली आहेच, पण लोन घेण्याची प्रक्रिया आणि त्याचे फायदे देखील समजावून सांगितले आहे. अनेकदा आपण जे वाचतो, त्यापेक्षा जे बघतो ते अधिक लक्षात राहतं आणि समजतं. हाच फंडा या जाहिरातीत दिसला आहे. माधुरी दीक्षित आपल्या जाहिरातीतून प्रेक्षकांना हेच सांगताना दिसली आहे.
माधुरी दीक्षितचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांना देखील आवडला आहे. अनेक जण तिच्या या नृत्याचे कौतुक करत आहेत. दुसरीकडे काही जण मात्र यावर शेलकी टीका करताना देखील दिसले आहेत. माधुरीच्या नृत्याएवढी लोन घेण्याची प्रक्रिया सोपी असते का?, असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.