सध्या 'पंचक' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी केली असल्यामुळे सर्वांचे लक्ष चित्रपटाकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यापाठोपाठ आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमधीलही काही नामवंत कलाकारांनी 'पंचक'च्या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे. नवीन वर्षात प्रदर्शित होणारा हा चित्रपट मल्टीस्टारर आहे.
'पंचक'च्या पहिल्या ट्रेलरने खूप उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता या दुसऱ्या ट्रेलरने अधिक भर टाकली आहे. खोतांच्या घराला पंचक लागल्याने 'आता कोणाचा नंबर ?' हा प्रश्न अवघ्या घराला पडलेला असतानाच, अनेक जण आपापल्या परीने हे संकट टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या गोंधळात घरात सर्कस होत आहे, ऑपेराही होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे, याचे उत्तर प्रेक्षकांना ५ जानेवारी रोजी मिळणार आहे.
वाचा: "पुन्हा संसार थाटणार", अरबाजच्या लग्नानंतर मलायकाचे दुसऱ्या लग्नाबाबत मोठे वक्तव्य
डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.