Madhuri Dixit: नव्वदच्या दशकात बॉलिवूडमधून अनेकदा नायिकांच्या प्रतिस्पर्ध्याच्या बातम्या येत असत. त्यावेळी माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्यात वैर असल्याची अफवा पसरली होती. श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित या दोघीही त्यांच्या काळातील टॉप हिरोईन होत्या. आता एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने श्रीदेवीसोबतच्या शत्रुत्वावर मौन सोडले आहे. ती म्हणाली की, ती श्रीदेवीचा खूप आदर करते. दोघीही आपापल्या करिअरमध्ये व्यस्त असल्याने त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही, असेही माधुरीने सांगितले.
माधुरी दीक्षितने नुकताच न्यूज १८ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये माधुरीने श्रीदेवीसोबत कधी बोलणेच झाले नाही असे सांगितले. 'मी आणि श्रीदेवीने कधीही एकत्र काम केले नाही' असे माधुरी म्हणाली. या दोघींनी कधीही एकत्र काम केले नाही, पण मुलाखतीत माधुरीने श्रीदेवीच्या यशाचे कौतुक केले. 'आम्ही दोघीही एकमेकांचा खूप आदर करत होतो. एक अभिनेत्री म्हणून मला तिच्याबद्दल आदर आहे. कारण, तिने वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केले, जे आश्चर्यकारक होते. ती माझ्याशी खूप गोड होती. पण आमचे कधीच बोलणे झाले नाही' असे माधुरी म्हणाली.
माधुरी दीक्षितने पुकार चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाची निर्मिती श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी केली होती. पण सेटवर त्यांची कधीच भेट झाली नाही. माधुरीने सांगितले की, "श्रीदेवी प्रॉडक्शनच्या कामात व्यस्त होती आणि तिचे (माधुरीचे) लक्ष तिच्या भूमिकेवर होते. त्यामुळं दोघांमध्ये फारकमी बोलणं व्हायचं. आम्हाला कधीच जास्त बोलण्याची संधी मिळाली नाही."
वाचा: फाटलेले कपडे घालून कंटाळलो होतो; विक्रांत मेसीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ
माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिचा भूल भुलैया ३ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.