Madhuri Dixit Son Arin Nene Viral Video: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिने बॉलिवूड मनोरंजन विश्वावर अक्षरशः राज्य केलं आहे. आपल्या किलर हास्याने सगळ्यांची मन जिंकून घेणारी माधुरी दीक्षित तिच्या नृत्यासाठी जितकी प्रसिद्ध आहे, तितकीच ती तिच्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. माधुरी दीक्षितच्या नृत्याने आजही लोक घायाळ होतात. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर माधुरी दीक्षितने चित्रपटसृष्टीतून बराच काळ ब्रेक घेतला होता. या दरम्यान, ती दोन मुलांची आई झाली. माधुरीच्या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माधुरीच्या मोठ्या मुलाचे नाव अरिन नेने आणि धाकट्या मुलाचे नाव रायन नेने आहे. मुलांच्या संगोपनासाठी माधुरीने कामातून ब्रेक घेतला आहे. माधुरी दीक्षित हिचा मोठा मुलगा अरिन नेने नुकताच २१ वर्षांचा झाला आहे. माधुरी दीक्षितने तिच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या मोठ्या मुलाचे लूक पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. अरिन नेनेचा माचो लूक पाहून अनेक चाहत्यांनी हा मुलगा आता स्टार होणार असल्याचे म्हटले आहे.
अरिन नेने नुकताच २१ वर्षांचा झाला आहे. या निमित्ताने माधुरी दीक्षितने एक सुंदर व्हिडीओ बनवून त्याच्या बालपणापासूनच्या अनेक खास क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काही काळापूर्वी अरिन नेने त्याच्या वडिलांच्या यूट्यूब चॅनलवर, आई माधुरी दीक्षितसोबत दिसला होता. या व्हिडीओतील अरिन नेनेचा लूक पाहून चाहते त्याच्या प्रेमात पडले आहेत. व्हिडीओमध्ये अरिन नेने एका हँडसम हंकसारखा दिसत आहे. मॉडर्न क्लासिक हेअर स्टाइलमुळे त्याचा लूक खूपच छान दिसत आहे.
सोशल मीडियावर चर्चेत आलेला हा व्हिडीओ पाहून चाहते अरिन नेनेचे तोंड भरून कौतुक करत आहेत. चाहते त्याच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. जर, अरिन नेने चित्रपटात आला तर, तो सुपरस्टार होईल, असे काही चाहते म्हणत आहेत. काही नेटकऱ्यांनी अरिन नेनेची तुलना बॉलिवूड अभिनेत्यांसोबत केली आहे. अरिन इतर बॉलिवूड स्टार्सपेक्षाही जास्त देखणा आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. माधुरी दीक्षितचा मुलगा अरिन नेने सध्या अमेरिकेत शिकत आहे. आई-वडील प्रसिद्ध असून देखील अरिन अतिशय साधं आणि सामान्य आयुष्य जगत आहे.