बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. माधुरी ही मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने नृत्य, सौंदर्य, अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. माधुरीने ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’. ‘देवदास’, ‘खलनायक’ अशा दमदार चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आता माधुरी तिच्या चित्रपटांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर माधुरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती नव्या कारसोबत दिसत आहे. तिच्या या कारची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर माधुरीने सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने नवी कार खरेदी केली आहे. या कारचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माधुरीकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे, त्यात आता आणखी एक महागडी गाडी सहभागी झाली आहे. माधुरीची ही सुपरकार जवळपास ४ कोटी रूपयांची आहे.
धक-धक गर्लबरोबर तिच्या नवऱ्याला स्पोर्ट्स कार आणि सुपरकार्सचीही आवड आहे. त्यामुळे तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे, यात तिने नुकत्याच घेतलेल्या नवीन कारचाही समावेश झाला आहे. या कार खरेदीसाठी माधुरीने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातल्याचे पाहायला मिळाले. तर तिचे पती काळे शर्ट, काळी पँट व ब्लेझर घालून दिसत आहेत. त्यांच्या या नवीन कार खरेदी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर होत आहे.
वाचा: चिप्सच्या दुकानात बसून घेतले अभिनयाचे धडे, अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी वाचून डोळ्यात येईल पाणी
सोशल मीडियावर माधुरीच्या या नव्या सुपरकारचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. एका यूजरने 'माधुरीची ही कार खूप छान आहे' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'माधुरी तुझे खूप खूप अभिनंद' असे म्हटले आहे. माधुरीने स्वत: या व्हिडीओवर “मी खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप आनंदी आहे” असं म्हणत आपला आनंद व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या