Madhuri Dixit Panchak Box Office Collection : सध्या 'पंचक' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी केली आहे. त्यामुळे ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. ५ जानेवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाई विषयी...
द टॉप इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्या दिवशी 'पंचक' या चित्रपटाने २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी २८ लाख रुपये, तिसऱ्या दिवशी ३० लाख रुपये आणि चौथ्या दिवशी चित्रपटाने २० लाख रुपयांची कमाई केली आहे. एकूण या चित्रपटाने १ कोटी ३० लाख रुपयांची कमाई केली आहे.
वाचा: मेहंदी सोहळ्यात आमिर खानच्या जावयाचा मराठी कलाकारांसोबत भन्नाट डान्स
पहिला दिवस : २५ लाख रुपये
दुसरा दिवस : २८ लाख रुपये
तिसरा दिवस : ३० लाख रुपये
चौथा दिवस : २० लाख रुपये
घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले 'पंचक' कसे सुटणार हे 'पंचक' या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.
संबंधित बातम्या