मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: पोरीने नशीब काढलं! माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या! व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video: पोरीने नशीब काढलं! माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या! व्हिडीओ होतोय व्हायरल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 26, 2024 10:52 AM IST

Madhuri Dixit Husband Viral Video: सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या डॉ. श्रीराम नेने यांनी नुकताच पुरणपोळी बनवातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे ही पुरणपोळी त्यांनी स्वतः बनवली आहे.

पोरीने नशीब काढलं! माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या! व्हिडीओ होतोय व्हायरल
पोरीने नशीब काढलं! माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या! व्हिडीओ होतोय व्हायरल

Madhuri Dixit Husband Viral Video: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल्र’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी माधुरी नाही, तर तिचे पती डॉ. श्रीराम नेने देखील सोशल मीडियावर ट्रेंड होताना पाहायला मिळाले आहेत. डॉ. श्रीराम नेने देखील सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाले असून, वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. इतकंच नाही तर त्यांनी पत्नी माधुरी दीक्षित हिच्यासोबत मिळून चित्रपट निर्मिती क्षेत्रात देखील पाऊल टाकलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या डॉ. श्रीराम नेने यांनी नुकताच पुरणपोळी बनवातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे ही पुरणपोळी त्यांनी स्वतः बनवली आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये डॉ. नेने हे स्वतःच्या हातांनी पुरणपोळी बनवताना दिसले आहेत. डॉ. श्रीराम नेने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा ते आपल्या वेगवेगळ्या रेसिपींचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी व्हिडीओ चाहत्यांना देखील खूप आवडतात. अशातच यावेळी श्रीराम नेने यांनी खास पुरणपोळ्या बनवल्या आहेत. होळीच्या निमित्ताने त्यांनी हा पुरणपोळ्यांचा घाट घातला असून, यात ते अगदी डाळ शिजवून त्याचं पुरण तयार करण्यापासून ते पीठ मळून त्याची पोळी बनवण्यापर्यंत आणि ती व्यवस्थित तूप लावून शेकवण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी स्वतः करताना दिसले आहेत.

तापसी पन्नू लग्न बंधनात अडकली? सिक्रेट वेडिंग फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

स्वतःच्या हाताने बनवली पुरण पोळी!

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिलं की, ‘होळी हा कुटुंबासोबत साजरा करण्याचा सण आहे. महाराष्ट्रातील घरोघरी बनवली जाणारी ही खमंग पुरणपोळी कशी बनवायची? चला आज तुम्ही माझ्याकडून शिकून घ्या...’ या व्हिडीओमध्ये डॉ. श्रीराम नेने यांचे आई आणि वडील देखील दिसले आहेत. आपल्या लेकाने बनवलेली पुरणपोळी त्यांनी अगदी चवीने खाल्ली आहे. आता माधुरी दीक्षितच्या नवऱ्याला पुरणपोळ्या बनवताना बघून नेटकरी देखील सुखावले. जगभरातील चाहत्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ‘माधुरीनं नशीब काढलं’, असं नेटकरी म्हणत आहेत.

घटस्फोट दूरच... एकमेकांच्या रंगात रंगले ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन! फोटो पाहून चाहते सुखावले

चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स!

‘माधुरीनं पोरीनं नशीब काढलं... नवऱ्याला पुरण पोळी येते न्हवं.. लय भारी’, ‘जमलं की डॉक्टरसाहेब तुम्हाला. लकी आहेत माधुरी मॅडम’, ‘खरंच खूप छान सर तुम्ही बनवता ह्यात खूप काही आहे मस्त’, ‘वा भाऊजी तुम्ही पुरणपोळी बनवता‘, ‘जेव्हा बायको सुंदर असते, तेव्हा नवराच जेवण बनवतो’, अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

WhatsApp channel