मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  हे निराशाजनक आहे; 'ऑल आइज ऑन रफा' पोस्ट माधुरीने डिलिट करताच नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

हे निराशाजनक आहे; 'ऑल आइज ऑन रफा' पोस्ट माधुरीने डिलिट करताच नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

Aarti Vilas Borade HT Marathi
May 29, 2024 03:00 PM IST

माधुरी दीक्षितने इन्स्टाग्रामवरून व्हायरल झालेली 'ऑल आइज ऑन रफा' पोस्ट डिलीट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'ऑल आइज ऑन रफा' पोस्ट माधुरीने केली डिलिट
'ऑल आइज ऑन रफा' पोस्ट माधुरीने केली डिलिट

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात रविवारी रफायेथील छावणीत काही पॅलेस्टिनी ठार झाल्यानंतर 'ऑल आइज ऑन रफाह' या सोशल मीडिया मोहिमेला वेग आला. पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ 'ऑल आइज ऑन रफा' ही पोस्ट सोशल अनेक कलाकारांनी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा देखील यामध्ये समावेश आहे. पण काही वेळातच माधुरीने ही पोस्ट डिलिट केली. ते पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय होती माधुरीची पोस्ट?

माधुरीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला 'ऑल आइज ऑन रफाह' ही पोस्ट शेअर करत पॅलेस्टाइनला पाठिंबा दिला होता. पण काही वेळातच माधुरीने ही पोस्ट सोशल मीडियावरुन डिलिट करुन टाकली. त्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाचा: भाऊ, पाय पुरतात का?; नवी गाडी खरेदी केल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे झाला ट्रोल

माधुरीच्या पोस्टवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

माधुरीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान करुन काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत माधुरीने डिलिट केलेल्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने 'लोकांना काय वाटते या भीतीने एखादी पोस्ट टाकणे आणि डिलिट करणे हे खूप निराशाजनक आहे' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'मॅडम तुम्ही पोस्ट केल्यानंतर तिच्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहून डिलिट केली आहे ना' असे म्हटले आहे.
वाचा: अरे हाय काय अन् नाय काय;'गेला माधव कुणीकडे' नाटक पुन्हा पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा

चाहत्यांची कमेंट
चाहत्यांची कमेंट

काय आहे 'ऑल आइज ऑन रफाह'

गाझाच्या रफायेथे इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मुलांसह ४० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले. अनेक देश आणि मानवाधिकार संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. गंभीर जखमी झालेले मृतदेह आणि पॅलेस्टिनींची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यामधील एका फोटोवर 'ऑल आइज ऑन रफाह' असे लिहिण्यात आले आहे. हा मजकूर लिहिलेला फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वाचा: 'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक

या बॉलिवूड कलाकरांनी केला फोटो शेअर

भारतीय सेलिब्रिटींमध्ये प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, सामंथा रूथ प्रभू, स्वरा भास्कर, रिचा चड्ढा, दिया मिर्झा, दुलकर सलमान, कोंकणा सेन शर्मा, इलियाना डिक्रूझ आणि नोरा फतेही या कलाकारांनी 'ऑल आयज ऑन रफाह' ही पोस्ट शेअर केली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग