सध्या सगळीकडे दिवाळी मोठ्या थाटामाताट सादरी केली जात असल्याचे दिसत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्ग्जांपर्यंत सर्वजण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसत आहेत. अनेक कलाकार हे दिवाळी साजरी करण्यासाठी पार्टीचे आयोजिन करतात. दरम्यान, माधुरी दीक्षितचा दिवाळीतील एक प्रसंग समोर आला आहे. हा प्रसंग ऐकून अनेकांच्या भुवया उंचावतील. खरंतर, अभिनेत्रीचा लहानपणी दिवाळीच्या दिवशी मोठा अपघात झाला होता.
माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आजही प्रेक्षक तिच्या अभिनयाचे व नृत्याचे वेडे आहेत. माधुरीने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्यासोबत घ़डलेला एक भयानक किस्सा सांगितला आहे. एकदा ती तिच्या मैत्रिणीबरोबर दिवाळी साजरी करत होती. त्यानंतर एका मुलाने तिच्या हातात असलेल्या फटाक्याला आग लावली. त्यामुळे माधुरी दीक्षितसह अपघात घडला. वास्तविक, फटाक्याच्या आगीत अभिनेत्रीचे केस जळून गेले आणि तिचे सर्व केस जळून खाक झाले.
‘त्या काळात माझ्या चेहऱ्यावर कोणतीही हानी झाली नाही यासाठी मी आभारी आहे, अन्यथा आज मी अभिनेत्री नसती’, असे अभिनेत्रीने म्हटले होते. पण माधुरीच्या डोक्यावरील सर्व केस जळाल्यामुळे तिने काही महिने तिला टक्कल करुन रहावे लागले होते. हा अपघात अभिनेत्रीसाठी दुःखी स्वप्नापेक्षा कमी नाही. तेव्हापासून आतापर्यंत माधुरी दिवाळीच्या दिवशी फटाक्यांपासून दूर राहते. मात्र, माधुरीशिवाय इतरही अनेक कलाकार आहेत जे दिवाळीत फटाक्यांपासून दूर राहतात.
वाचा: लसणाच्या पाकळ्या खाऊन 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने काढले दिवस, विनय आपटेंना कळाले अन् बदलले आयुष्य
माधुरीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच भुल भुलैय्या ३ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'भूल भुलैया ३' या चित्रपटात कार्तिकसोबत तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित, संजय मिश्रा, राजपाल यादव आणि विजय राज यांच्याही भूमिका आहेत. तगडी स्टार कास्ट असल्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहण्याजोगे आहे.