Madhur Bhandarkar Birthday: कधीकाळी सिग्नलवर च्युइंगम विकायचा मधुर भांडारकर! कशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री? वाचा...-madhur bhandarkar birthday special madhur used to sell chewing gum at the signal how did you enter bollywood ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhur Bhandarkar Birthday: कधीकाळी सिग्नलवर च्युइंगम विकायचा मधुर भांडारकर! कशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री? वाचा...

Madhur Bhandarkar Birthday: कधीकाळी सिग्नलवर च्युइंगम विकायचा मधुर भांडारकर! कशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री? वाचा...

Aug 26, 2024 08:58 AM IST

Madhur Bhandarkar birthday Special: महिलाकेंद्रित चित्रपट बनवून मधुर भांडारकर यांनी नेहमीच बॉलिवूडमध्ये एक वेगळी कथा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना नेहमीच यश देखील मिळाले.

Madhur Bhandarkar birthday: कधीकाळी सिग्नलवर च्युइंगम विकायचा मधुर भांडारकर!
Madhur Bhandarkar birthday: कधीकाळी सिग्नलवर च्युइंगम विकायचा मधुर भांडारकर!

Happy birthday Madhur Bhandarkar: महिलाकेंद्रित चित्रपट बनवून मधुर भांडारकर यांनी नेहमीच बॉलिवूडमध्ये एक वेगळी कथा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना नेहमीच यश देखील मिळाले. आजघडीला त्यांची गणना बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये होते. मात्र, त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा ते सिग्नलवर च्युइंगम विकायचे. इतकंच नाही तर, त्यांनी कॅसेटच्या दुकानात काम केले, त्यानंतर फिल्मी दुनियेत प्रवेश केला आणि सर्वांना आपले फॅन बनवले. मधुर भांडारकर यांचा जन्म २६ ऑगस्ट १९६८ रोजी मुंबईत झाला. चला जाणून घेऊया बॉलिवूडच्या या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाबद्दल काही खास आणि रंजक गोष्टी...

मधुर भांडारकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झालेला. यातच त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांच्या घरची परिस्थिती इतकी बिकट होती की, त्यांना अवघ्या सहाव्या इयत्तेतच शिक्षण सोडावे लागले. त्यावेळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी ट्रॅफिक सिग्नलवर च्युइंगम विकण्याचे काम सुरू केले होते. मात्र, कालांतराने ते काही ना काही नवीन शिकत राहिले.

Asha Sharma Death: 'कुमकुम भाग्य' मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

१७०० कॅसेट्समधून शिकले चित्रपटांचे बारकावे!

याच संघर्षाच्या दिवसांत मधुर भांडारकर यांनी कॅसेटच्या दुकानातही काम करण्यास सुरुवात केली होती. या दुकानात काम करत असताना त्यांनी खूप कॅसेट पाहिल्या. हळूहळू मधुर भांडारकर यांनी स्वतः कॅसेटचा व्यवसाय करायला सुरुवात केली आणि त्यासाठी त्यांनी १७०० कॅसेट जमा केल्या होत्या. यासोबतच त्यांना आता चित्रपट निर्मितीतील बारकावेही समजू लागले होते. त्या काळात त्यांनी अनेक छोट्या दिग्दर्शकांसोबत काम केले, ज्यासाठी त्यांना एक हजार रुपये मानधन मिळू लागले. त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्यासोबत सहाय्यक म्हणूनही काम केले.

पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला आणि...

अनेकांचे सल्ले घेतल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून मधुर भांडारकर यांनी पहिला चित्रपट त्रिशक्ती बनवला होता. मात्र, तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे लोक मधुर भांडारकरला टाळू लागले होते. मात्र, त्यांनी आपली हिंमत खचू दिली नाही. यानंतर मधुर भांडारकर यांनी मुंबईच्या रस्त्यांवर आणि सिग्नलवर भटकण्याचा अनुभव वापरून ‘चांदनी बार’ हा चित्रपट बनवला. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर गाजलाच, पण त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. यानंतर मधुर भांडारकर यांनी ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘पेज ३’ आणि ‘फॅशन’सारखे चित्रपट केले. त्यानंतर आता त्यांचे नाव प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत सामील झाले आहे.

विभाग