मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'मला उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा अभिमान', गायक लकी अली यांचं बिनधास्त वक्तव्य

'मला उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा अभिमान', गायक लकी अली यांचं बिनधास्त वक्तव्य

Payal Shekhar Naik HT Marathi
Jun 24, 2022 02:52 PM IST

(lucky ali) आता लोकप्रिय बॉलिवूड पार्श्वगायक लकी अली (lucky ali) यांनीही आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे.

लकी अली
लकी अली

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकीय पटलावर झालेल्या या बदलानंतर हे सगळं काय सुरू आहे असा प्रश्न सामान्य माणसाला पडलेला आहे. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी केलेलं बंड आणि त्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया पाहता आणखी अनेक गोष्टी महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळणार आहेत हे नक्की. या सगळ्या परिस्थितीवर अनेक मराठी कलाकार आपली मतं मांडताना दिसतायत. त्यासोबतच काही बॉलिवूड कलाकारही स्पष्टपणे आपला पाठिंबा जाहीर करताना दिसतायत. आता लोकप्रिय बॉलिवूड पार्श्वगायक लकी अली (lucky ali) यांनीही आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे.

एकमेकांना खाली खेचण्याचा या राजकारणात दररोज नवनवे दावे करण्यात येत आहेत. निष्ठावान कार्यकर्ते आपली निष्ठा कोणासोबत आहे हे स्पष्टपणे सांगत असले तरी अशा कलाकारांची संख्या कमीच आहे. मात्र अशातच लकी अली यांनी एक ट्विट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लकी अली यांनी उद्धव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. आपल्याला ते आवडतात आणि आपण त्यांच्यासोबत असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. अली यांनी ट्विट करत लिहिलं, 'मला उद्धव ठाकरे आवडतात आणि मला त्यांच्या राजकारणी असण्याचा अभिमान आहे. बास पूर्ण विराम.' असं ट्विट करत त्यांनी उद्धव यांचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.

 

<p>lucky ali tweet</p>
lucky ali tweet
<p>lucky ali with uddhav thackeray</p>
lucky ali with uddhav thackeray

 

लकी अली यांनी यापूर्वीही मातोश्रीवर जाऊन उद्धव यांची भेट घेतली होती. तेव्हाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले होते. आता त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा ते नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. काही नेटकरी त्यांना पाठिंबा देत आहेत तर काही त्यांना विरोध करत आहेत.

IPL_Entry_Point