Loveyapa Movie Review : आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांचा 'लव्हयापा' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दोन्ही स्टार किड्स रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. या दोघांनी यापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, पण ते त्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रोजेक्ट्स होते. आता ते खऱ्या अर्थाने मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. आता या दोघांचा पहिला चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तुम्हीही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर त्या आधी हा चित्रपट कसा आहे ते जाणून घ्या…
आजच्या पिढीला फोनचं वेड कसं लागलं आहे आणि आता सोशल मीडिया त्यांच्या आयुष्यावर कसे नियंत्रण ठेवतो, हे ‘लव्हयापा’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट २ प्रेमींवर आधारित आहे, ज्यामध्ये दोघेही लग्न करण्याचा विचार करतात, परंतु त्यापूर्वी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चित्रपटाच्या पूर्वार्धात मुलाला मुलीच्या एक्सबद्दल कळते, तर उत्तरार्धात मुलाच्या फोनमध्ये काय घडतेय याचा उलगडा मुलीला होतो. यानंतर दोघांमध्ये ‘लव्हयापा’ सुरू होतो.
या चित्रपटाची एडिटिंग जरा कमी पडल्या सारखे वाटते. स्नेहा देसाई यांची पटकथा आणि संवाद चांगले आहेत, ज्यामुळे चित्रपटात काही गमतीशीर क्षण पाहायला मिळतात. पण, चित्रपट थोडा ताणला गेला आहे. यामुळे प्रेक्षक वर्ग कदाचित थोडा कंटाळू शकतो. पण, यातले विनोद तुम्हाला खुर्चीवरून उठू देणार नाहीत, हे नक्की.
या चित्रपटातील प्रमुख कलाकार जुनैद आणि खुशी यांनी खूप मेहनत घेतली आहे. ‘आर्चीस’ चित्रपटानंतर खुशीच्या अभिनयात बरीच सुधारणा झाली आहे. जुनैदला अजून ही कामाची गरज आहे. तो रिहर्सल टाईम अॅक्ट करत आहे, असं दिसतंय. त्याला रोमँटिक सीन्स फारसे चांगले करता आलेले नाहीत. मात्र, तो अधिक चांगली कामगिरी करू शकतो. तर, खुशीने इमोशनल सीन्स खूप छान केले आहेत.
आशुतोष राणानेही उत्तम काम केले आहे. विशेष म्हणजे जान्हवीच्या 'धडक' या पहिल्याच चित्रपटात आशुतोषच तिचे वडील झाले होते. त्यांनी या चित्रपटात एक वेगळंच आकर्षण आणलं आहे. जुनैदच्या आईची भूमिका साकारणाऱ्या ग्रुषा कपूरलाही चांगली स्क्रीन स्पेस मिळाली आणि तिने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. चांगली गोष्ट म्हणजे कीकू शारदाला एक वेगळी भूमिका मिळाली, जी केवळ कॉमिक नाही.
एकंदरीत चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ‘लव्हयापा’ हा चित्रपट ‘जाने तू या जाने ना’सारखा नाही, जो कल्ट हिट झाला होता. पण, हा चित्रपट एकवेळ बघण्यासारखा नक्कीच आहे.
संबंधित बातम्या