मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi OTT Release: ‘लॉस्ट अँड फाऊंड’ सिनेमा घर बसल्या पाहायचा आहे? मग ही बातमी नक्की वाचा

Marathi OTT Release: ‘लॉस्ट अँड फाऊंड’ सिनेमा घर बसल्या पाहायचा आहे? मग ही बातमी नक्की वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 02, 2024 08:16 AM IST

Lost And Found Movie: ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या चित्रपटात अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता हा मराठी चित्रपट घर बसल्या पाहायला मिळणार असल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे.

Lost And Found Movie
Lost And Found Movie

OTT Binge Watch Movies: ओटीटी विश्व म्हणजे अक्षरशः मनोरंजनाचा खजिनाच आहे. अनेक लोक घरी बसून छान ओटीटीवरचे काही चित्रपट एन्जॉय करताना दिसतात. अगदी जुन्या प्रसिद्ध चित्रपटांपासून ते काल-परवा आलेल्या चित्रपटापर्यंत सगळेच चित्रपट आता ओटीटीवर बघता येतात. आजकाल अनेक मराठी चित्रपट देखील ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसतात. आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री स्पृहा जोशीचा ‘लॉस्ट अँड फाऊंड’ हा मराठी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हे ऐकून चाहत्यांना आनंद झाला आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर संदेश दिला आहे.
वाचा: माया मनूला घेऊन अमेरिकेला जाणार? काय होणार आजच्या भागात

काय आहे ‘लॉस्ट अँड फाऊंड’ कथा?

आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख लोक उराशी बाळगून असतात, कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांना एकटेपणा जाणवतो. अशा लोकांच्या आयुष्यातील संवादाचा दुरावा भरून काढण्यासाठी मानस, नैना, मारुती आणि श्रीरंग काका हे चार लोक ‘ॲंटी लोनलीनेस प्रोग्राम’ सुरू करतात, लोकांच्या जीवनातील एकटेपणाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतात. पण प्रोग्राम यशस्वी ठरेल की नाही हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.

कुठे पाहायला मिळणार चित्रपट?

‘लॉस्ट अँड फाऊंड’ २९ जुलै २०१६मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे. हा चित्रपट अल्ट्रा झकास या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चाहते घर बसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.

‘लॉस्ट अँड फाऊंड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋतुराज धलगाडेने केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाने २०१६ साली फारशी कमाई केली नव्हती. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

WhatsApp channel

विभाग