Lok Sabha Elections 2024 : कंगना रनौत ते अरुण गोविल; लोकसभा निवडणुकीत कोणत्या कलाकारांना मिळाला विजय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lok Sabha Elections 2024 : कंगना रनौत ते अरुण गोविल; लोकसभा निवडणुकीत कोणत्या कलाकारांना मिळाला विजय?

Lok Sabha Elections 2024 : कंगना रनौत ते अरुण गोविल; लोकसभा निवडणुकीत कोणत्या कलाकारांना मिळाला विजय?

Jun 05, 2024 07:36 AM IST

Lok Sabha Elections 2024: निवडणुकीच्या रणात यंदा अनेक सेलिब्रिटींनी मोठे विजय मिळवले आहेत. तर, काहींना पराभव देखील पत्करावा लागला आहे.

लोकसभा निवडणुकीत कोणत्या कलाकारांना मिळाला विजय?
लोकसभा निवडणुकीत कोणत्या कलाकारांना मिळाला विजय?

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक २०२४चे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी निवडणुकीच्या रणधुमाळीत भाग घेतला होता. प्रत्येकालाच हे जाणून घ्यायचे होते की, त्यांचे आवडते कलाकार राजकारणात रणात चमत्कार करू शकतील का.... यंदा अनेक सेलिब्रिटींनी मोठे विजय मिळवले आहेत. तर, काहींना पराभव देखील पत्करावा लागला आहे. चला तर, जाणून घेऊया कोणाला मिळाला विजय आणि कोणी पत्करली हार...

कंगना रनौत

कंगना रनौतने मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात तिने विजय मिळवला. कंगनाने भरघोस मतांनी विजय मिळवला. तिने काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांच्यासह इतर उमेदवारांचा पराभव केला.

अरुण गोविल

मेरठ-हापूर लोकसभा मतदारसंघातून अरुण गोविल १०५८५ मतांनी विजयी झाले. यासह अरुण यांनी भाजपचा ७२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. यावेळी भाजपने राजेंद्र अग्रवाल यांचे तिकीट रद्द करत अरुण गोविल यांना उमेदवारी दिली होती.

हेमा मालिनी

हेमा मालिनी यांनी मथुरा लोकसभा मतदारसंघात २९३४०७ मतांनी विजय मिळवला आहे. हेमा यांनी १६ उमेदवारांचा पराभव करत हा विजय मिळवला आहे. हा त्यांचा मोठा विजय आहे.

A Valentines Day: हास्यजत्रा फेम अरूण कदम म्हणतायत 'डोन्ट वरी'! नवंकोरं गाणं सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल

पवन कल्याण

जनसेना पक्षाचे संस्थापक आणि स्टार पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशातील पिथापुरम विधानसभा मतदारसंघातून व्हायएसआरसीपीच्या वंगा गीता विश्वनाथम यांचा पराभव केला आहे.

शत्रुघ्न सिन्हा

आसनसोल लोकसभा मतदारसंघातून अभिनेता आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले आहेत. त्यांची स्पर्धा भाजपचे खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते एसएस अहलुवालिया यांच्याशी होती.

मनोज तिवारी

भोजपुरी सुपरस्टार आणि ईशान्य दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवलेले भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांनी कन्हैया कुमारचा पराभव करून विजय मिळवला आहे.

हेमा मालिनी ते रवि किशन; ‘या’ कलाकारांनी निवडणूक तर जिंकलीच पण मनोरंजन विश्वातही दबदबा ठेवला कायम!

रवि किशन

‘लापता लेडीज’मध्ये आपल्या अभिनयाने सगळ्यांची माने जिंकणारे भाजपचे उमेदवार रवि किशन गोरखपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

हंस राज हंस

पंजाबच्या फरीदकोट लोकसभा जागेवर हंस राज हंस यांचा पराभव झाला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी सरबजीत सिंह खालसा यांनी त्यांचा २९८०६२ मतांनी त्यांचा पराभव केला.

दिनेश लाल यादव

भोजपुरी स्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव यांचा समाजवादी पक्षाच्या धर्मेंद्र यादव यांच्याकडून १६१०३५ मतांनी पराभव झाला आहे.

Whats_app_banner