आज देशातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास ११ मतदार संघात आज मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. दिग्गजांपासून, कलाकारांपासून ते सर्वसामान्य सर्वजण मतदानासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. मराठमोळा अभिनेता सुबोध भावेने नुकताच पुण्यात मतदान केले आहे. त्यानंतर त्याने चाहत्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे.
"बदल घडला पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या. तुम्हाला कोणीही मतदानापासून वंचित ठेऊ शकत नाही. तुम्हाला जर त्यादिवशी मतदान करायचे असेल तर कोणतीच शक्ती तुम्हाला त्याच्यापासून लांब ठेऊ शकत नाही. त्यामुळे जरूर मतदान करा" असे सुबोध भावे म्हणाला.
वाचा: बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ
पुढे तो म्हणाला, "जो तुम्हाला योग्य वाटतो त्यालाच मत द्या. पण नक्की मत द्या. मत वाया घालवू नका. अनेकवेळा बोगस मतदानाचे सरास प्रकार घडतात. तुमच्या नावावर कदाचीत दुसरे कोणीतरी येऊन मतदान करू शकतात. तुमच्याकडे जर तुमचे नाव आले नाही तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला नक्की जाब विचारा. त्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपले मतदान कधी होणार आहे. मतदान लोकसभेचे असो वा विधानसभेचे असो त्याच्याआधी एकदा आपल्याकडचे मतदान ओळखपत्र बरोबर आहे की नाही, आपले नाव यादीत आहे की नाही या सर्व गोष्टी चेक करुन घ्या. कारण हे आपले प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडलेच पाहिजे."
वाचा: वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष
"मला राजकारणाबद्दल काहीच बोलायचे नाही. त्याविषयी शून्य आवड माझ्या मनात आहे. पण कोणाला मतदान करायचे हे मात्र मला चांगलेच माहिती आहे. तसेच मला माहिती आहे हे माझे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते मी नक्की पार पडणार" असे सुबोध म्हणाला.
वाचा: 'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज
सुबोध भावे मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट हिट होताना दिसतोय. सुबोध आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यांची ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सुबोध सोबत शिवानी सोनार ही अभिनेत्री दिसणार आहे. या मालिकेत AIचा वापर करुन तरुणपणीचा सुबोध भावे देखील दाखवण्यात येणार आहे.