मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lockdown Lagna: प्रवीण तरडे यांच्या 'लॉकडाऊन लग्न'मध्ये ‘हे’ कलाकार दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत!

Lockdown Lagna: प्रवीण तरडे यांच्या 'लॉकडाऊन लग्न'मध्ये ‘हे’ कलाकार दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 23, 2024 11:39 AM IST

Lockdown Lagna Marathi Movie: लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट ‘लॉकडाऊन लग्न’ या आगामी मराठी चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.

Lockdown Lagna Marathi Movie
Lockdown Lagna Marathi Movie

Lockdown Lagna Marathi Movie: अभिनेते प्रवीण तरडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या नव्या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘लॉकडाऊन लग्न’ असं या नव्या आगामी चित्रपटाचं नाव असून, नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. येत्या ८ मार्चला म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आता अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री प्रीतम कागणे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘लॉकडाऊन लग्न’ या धमाल चित्रपटात रमेश आणि प्रीतम यांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली आहे.

रमेश परदेशी आणि प्रीतम कांगणे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटातून त्यांच्या सक्षम अभिमनयाचं दर्शन घडवलं आहे. ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटात ते पहिल्यांदा़च भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. बहिणीच्या लग्नासाठी भाऊ किती कष्ट घेतो, बहिणीला चांगला नवरा मिळवून देण्यासाठी तो किती धडपड करतो, हे लग्न जुळवताना त्यालाच एक मुलगी आवडते, त़्या दरम्यान काय धमाल होते, याचं चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Cinema Lovers Day 2024: सिनेप्रेमींसाठी पर्वणी! अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरमध्ये पाहता येणार चित्रपट

कोरोना काळ सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक असला, तरी या काळात अनेक गंमतीजमती देखील झाल्या होत्या. लग्न म्हटलं, की धमाल ही असतेच. त्यामुळे ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटातून लग्नाची गोष्ट कशा प्रकारे दाखवली जाणार, याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. तीन वर्षांपूर्वीचा महाभयंकर कोरोना काळ आणि त्यादरम्यान लागलेला लॉकडाऊन हा आजही सगळ्यांच्या चांगलाच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट ‘लॉकडाऊन लग्न’ या आगामी मराठी चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, सुनील अभ्यंकर, प्रवीण तरडे, क्षितिष दाते, अमोल कागणे, विराट मडके,प्राजक्ता गायकवाड,अश्विनी चावरे, चेतन चावडा, किरण कुमावत, सुशांत दिवेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

अमोल कागणे प्रस्तुत लॉकडाऊन लग्न या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कांगणे, अमोल कांगणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. चित्रपटातून कोरोना काळातल्या लग्नाची गोष्ट दाखवली जाणार आहे. उत्तम स्टारकास्टसह धमाल, मजेशीर आणि मनोरंजक असं कथानक या चित्रपटाची खासियत आहे.

IPL_Entry_Point