मराठी बातम्या  /  Entertainment  /  Live Update: Disha Wakani Will Not Return In 'Taraq Mehta ...', Khuda Hafeez 2 Trailer

दिशा वकानी ते खुदा हाफिज २

live Update: वाचा मनोरंजन जगतातील दिवसभरातील घडामोडी, दिशा वकानी ते खुदा हाफिज २

06:20 PM ISTPayal Shekhar Naik
  • twitter
  • Share on Facebook
06:20 PM IST

लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये दयाबेन साठी सुरू झाल्या नव्या ऑडिशन. दिशा वकानी मालिकेत परतणार नाही, निर्मात्यांची माहिती.

Wed, 08 Jun 202202:20 PM IST

'मिस मारव्हेल' मधील फरहान अख्तरचा लूक आला समोर

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर मारवेल युनिव्हर्सच्या 'मिस मारव्हेल' या सिरीज मध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सिरीजमधील त्याचा फर्स्ट लूक चाहत्यांसमोर आला आहे. चाहत्यांना हा लूक पसंत पडत असून अभिनेत्री आणि फरहानची पत्नी शिबानी दांडेकर हिने त्याचा लूक एक पोस्ट करत शेअर केला आहे.

<p>farhan akhtar's first look in ms marvel</p>
farhan akhtar's first look in ms marvel

Wed, 08 Jun 202202:07 PM IST

मिताली राजची क्रिकेट कारकीर्द तापसीच्या 'शाबाश मिट्ठू' मधून दिसणार, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

भारतीय क्रिकेटपटू मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिचे आभार मानले आहे. तापसीने एक पोस्ट शेअर करत मितालीच्या आजवरच्या कामगिरीबद्दल तिचं कौतुक केलं आहे. सोबतच मितालीच्या आयुष्यावर आधारित तापसीचा 'शाबाश मिट्ठू' येत्या १५ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. मितालीने गेल्या २३ वर्षात सतत सात वेळा ५० धावा बनवण्याचा रेकॉर्ड केला आहे. सोबतच तिने भारतीय संघाचं नेतृत्व देखील केलं आहे.

Wed, 08 Jun 202201:23 PM IST

राकेश बापट शमिता शेट्टी यांचं ब्रेकअप, चाहत्यांना मोठा धक्का

'बिग बॉस ओटीटी' फेम राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहेत. काही कारणामुळे आता राकेश आणि शमिता यांच्यातील नातं संपुष्टात आल्याच्या चर्चा आहेत. राकेश आणि शमिता यांची भेट 'बिग बॉस ओटीटी' च्या सेटवर झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र आता काही महिन्यातच त्यांचं नातं संपलं असल्याची माहिती मिळतेय. त्यांनी हे सगळं फक्त बिग बॉसच्या घरात टिकण्यासाठी केल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहेत..

Wed, 08 Jun 202201:13 PM IST

'विक्रम'च्या जबरदस्त यशानंतर कमल हासन खुश, दिग्दर्शकाला भेट दिली २ कोटींची गाडी

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्या 'विक्रम चित्रपटाने सिनेमागृहात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पाच दिवसातच या चित्रपटाने जगभरातून तब्बल २०० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर अभिनेते कमल हासन यांनी 'विक्रम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला तब्बल २ कोटींची गाडी भेट दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश यांनी एक पोस्ट करत त्यांचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच कमल यांनी लिहिलेलं भावनिक पत्रही त्यांनी शेअर केलं आहे.

Wed, 08 Jun 202201:00 PM IST

'खुदा हाफिज चॅप्टर २- अग्निपरीक्षा' चा ट्रेलर प्रदर्शित, विद्युत जामवाल इन ऍक्शन मोड

नुकताच बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याच्या 'खुदा हाफिज चॅप्टर २- अग्निपरीक्षा' चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रदर्शित होताच या ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ऍक्शन आणि इमोशन यांचा सुयोग्य मेळ असलेला हा चित्रपट ८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट विद्युतच्या 'खुदा हाफिज' चित्रपटाचा पुढील भाग असणार आहे.

Wed, 08 Jun 202212:45 PM IST

'तारक मेहता..' च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, दयाबेन बनून कधीही परतणार नाही दिशा वकानी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत न दिसणाऱ्या दया बेनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीवरून हे स्पष्ट होतंय की दिशा वकानी आता कधीही तारक मेहता मध्ये परतणार नाही. त्याजागी नव्या दया बेनसाठी ऑडिशन घेणं सुरू आहे. दिशा २०१७ पासून मालिकेतून गायब आहे. मात्र अजूनही ती मालिकेत परत आलेली नाही. आता दिशाने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे, त्यामुळे निर्मात्यांनी तिच्या जागी नव्या अभिनेत्रीला संधी देण्याचं ठरवलं आहे. आता मालिकेत दिशाच्या जागी नवी अभिनेत्री दया म्हणून दिसणार आहे.

<p>दिशा वकानी</p>
दिशा वकानी