मुंबईतील गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये अनेक मालिकांचे सेट उभारलेले आहेत. या सेटवर मध्यरात्री बिबट्या आल्याच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. आता 'प्रेमास रंग यावे' मालिकेच्या सेटवर मध्यरात्री बिबट्या आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बिबट्या सेटवर फिरताना दिसत आहे. नशीबाने मध्यरात्री मालिकेचे शुटिंग नसल्यामुळे कोणीही सेटवर उपस्थित नव्हते.