Leo Box Office Collection: थलापती विजयच्या 'लिओ'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पाहा कलेक्शनचे आकडे!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Leo Box Office Collection: थलापती विजयच्या 'लिओ'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पाहा कलेक्शनचे आकडे!

Leo Box Office Collection: थलापती विजयच्या 'लिओ'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पाहा कलेक्शनचे आकडे!

Published Oct 25, 2023 09:24 AM IST

Leo box office collection worldwide day 6: थलापती विजयचा 'लिओ' अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे. त्याचा हा पॅन इंडिया चित्रपट आठवड्याच्या मधल्या दिवशीही चांगली कमाई करत आहे.

Leo box office
Leo box office

Leo box office collection worldwide day 6: साऊथ स्टार थलपती विजयचा 'लिओ' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सध्या चर्चेत असलेला 'लिओ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. थलापती विजयचा 'लिओ' अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे. त्याचा हा पॅन इंडिया चित्रपट आठवड्याच्या मधल्या दिवशीही चांगली कमाई करत आहे. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने जवळपास २५० कोटींचा गल्ला जमवला आहे. आता दसऱ्याच्या सुट्टीचा फायदा देखील या चित्रपटाला झाला आहे. या चित्रपटाने सुट्टीच्या दिवशी धमाकेदार कमाई केली आहे.

विजयच्या 'लिओ' या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आहे.साऊथचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. या चित्रपटाने जगभरात ४०० कोटींचा आकडाही पार केला आहे. रिलीजच्या ६व्य दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर 'लिओ'चा जलवा पाहायला मिळाला.

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे प्रेक्षकांच्या नजरेत ठरतेय व्हिलन! 'बिग बॉस १७'च्या घरात नेमकं काय झालं?

थलपथी विजयच्या 'लिओ' या चित्रपटानेही सहाव्या दिवशी हिंदीत चांगले कलेक्शन केले आहे. सॅकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, 'लिओ'ने सहाव्या दिवशी ३२.४५कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने तामिळमध्ये २७ कोटी रुपये, तेलुगूमध्ये २.९ कोटी रुपये आणि हिंदीमध्ये २.५५ कोटी रुपये कमावले आहेत. यानंतर एकूण संकलन २४९.५५ कोटी झाले आहे. 'लिओ'ने पहिल्या दिवशी ६४.८ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ३५.२५ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ३९.८ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ४१.५५ कोटी रुपये आणि पाचव्या दिवशी ३५.७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'लिओ'चा झंझावात जोरदार सुरू आहे. हा चित्रपट भारतात २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला असतानाच, या चित्रपटाने पाच दिवसांत जगभरात ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'लिओ'बद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटात थलापती विजयसोबत त्रिशा कृष्णन आणि संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले आहेत. या चित्रपटात संजय दत्तने नकारात्मक भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे.

Whats_app_banner