Legendary singer Bhupinder singh passes away : प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. त्यांची पत्नी मिताली सिंह यांनी भूपिंदर सिंह यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
दहा दिवसांपूर्वी भूपिंदर सिंह यांना क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग झाल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्याचीच तपासणी सुरू होती. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यानं त्यांची पुढची तपासणी थांबली होती. कोरोनावर उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी त्यांचे साडेसातच्या सुमारास निधन झाले.
भूपिंदर सिंह त्यांना युरिनरी इन्फेक्शनही झालं होतं. अखेर आज मुंबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
गायक भूपिंदर सिंह यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४० रोजी अमृतसर येथे पंजाबी कुटूंबात झाला. वडील नत्था सिंह यांच्याकडून त्यांना संगीताचे शिक्षण मिळालं. त्यांना लहानपणापासून गिटार वाजवण्यात विशेष रस होता. बॉलिवूडमधील अनेक हिट व अजरामर गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांनी गायलेल्या गझलांमुळे त्यांना एक विशेष ओळख मिळाली आहे. त्यांच्या पत्नी मिताली सिंह यादेखील प्रख्यात गायिका आहेत. पत्नी मिताली यांच्यासोबत त्यांनी गझल गायनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.
सिंग यांना “मौसम”, “सत्ते पे सत्ता”, “आहिस्ता आहिस्ता”, “दूरियां”, “हकीकत” आणि इतर बर्याच चित्रपटांमधील त्यांच्या संस्मरणीय गाण्यांसाठी लक्षात ठेवले जाते.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार कधी व कोठे केले जाणार आहेत याबाबत अधिक तपशील मिळू शकलेला नाही.
भूपिंदर सिंह यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी
संबंधित बातम्या