Kapil Sharma Show : 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'ला कायदेशीर नोटीस, सलमानच्या टीमने दिले स्पष्टीकरण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kapil Sharma Show : 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'ला कायदेशीर नोटीस, सलमानच्या टीमने दिले स्पष्टीकरण

Kapil Sharma Show : 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'ला कायदेशीर नोटीस, सलमानच्या टीमने दिले स्पष्टीकरण

Nov 14, 2024 09:48 AM IST

Great Indian Kapil Sharma Show : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ला बोंगो भाषिक महासभा फाऊंडेशनने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या शोवर करण्यात आला आहे.

द ग्रेट इंडियन कपिल शो
द ग्रेट इंडियन कपिल शो

Great Indian Kapil Sharma Show : कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ला कायदेशीर नोटीस मिळाली आहे. ही कायदेशीर नोटीस १ नोव्हेंबरला द कपिल शोच्या टीमला पाठवण्यात आली आहे. बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि महान कवी रवींद्रनाथ टागोर यांची खिल्ली उडवल्याचा आरोप या कार्यक्रमावर करण्यात आला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'ला कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसलाही या वादात कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, सलमानच्या टीमने आपला या शोशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.  

बोंगो भाषिक महासभा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. मंडल यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये असे काही कृत्य घडले जे रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल अपमानजनक असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. अशा कृत्यांमुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील बंगाली समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.  

कपिलची टीम काय म्हणाली?

रवींद्रनाथ टागोर यांच्या कार्याचा चुकीचा अर्थ लावण्याचा आमचा हेतू नव्हता, असे 'द कपिल शो'च्या टीमने या नोटीसला उत्तर देताना म्हटले आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा पूर्णपणे मनोरंजक विनोदी कार्यक्रम आहे. ही मालिका पॅरोडी आणि काल्पनिक स्केचेसने बनलेली असून कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा समुदायाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. 

Singham Again : ‘सिंघम अगेन’ बॉक्स ऑफिसवर ढेपाळला! १३ दिवसांत बजेटही वसूल झालं नाही; पाहा किती झाली कमाई

सलमान खानच्या टीमने हात केले वर!

दरम्यान, या प्रकरणी सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, सलमान खानच्या टीमने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या टीमचा या शोशी काहीही संबंध नसल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.  

नेटफ्लिक्सवर येण्यापूर्वी सलमान खान या शोची निर्मिती करत असल्याचे सलमान खानच्या टीमने स्पष्ट केले . सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसला कायदेशीर नोटीस मिळाल्याच्या वृत्तादरम्यान, कंपनीने नेटफ्लिक्सच्या या शोमध्ये कोणताही सहभाग असल्याचे नाकारले आहे. जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, म्हटले आहे की, आम्ही नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'शी संबंधित नाही. काही लोक तक्रार करत आहेत की सलमान खान/ प्रोडक्शनला देखील नोटीस मिळाली आहे, जे चुकीचे आहे. प्रॉडक्शन हाऊस यापुढे नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या शोच्या कोणत्याही ऑपरेशनशी संबंधित नाही आणि कायदेशीर सूचनेचा कोणताही परिणाम होणार नाही.

Whats_app_banner