Photo: 'ठिपक्यांची रांगोळी' मधील विठूबाबा आणि सुवा आईने घेतलं नवं घर
मालिकेतील विठू बाबा आणि सुवा आई यांनी प्रेक्षकांना एक न्यूज दिली आहे. या दोघांनी नुकतंच नवं घर घेतलं आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठिपक्यांची रांगोळी' चाहत्यांची आवडती आहे. फार कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. हसत खेळत असणारं कानिटकरांचं घर आणि त्यातील माणसं ही प्रेक्षकांच्या मनाला भावली आहेत. त्यांच्या घरातील नाती पाहून आपलंही घरच असं असावं असं नकळत वाटून जातं. याच मालिकेतील विठू बाबा आणि सुवा आई यांनी प्रेक्षकांना एक न्यूज दिली आहे. या दोघांनी नुकतंच नवं घर घेतलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
विठू बाबा म्हणजे अभिनेते मंगेश कदम आणि सुवा आई म्हणजे अभिनेत्री लीना भागवत हे मालिकेतच नाही तर खऱ्या आयुष्यातही पतिपत्नी आहेत. आणि नुकतंच त्यांनी नवं घर खरेदी केलं आहे. नुकताच या घराचा गृहप्रवेश सोहळा पार पडला आहे. लीना यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या मंगेश यांच्यासोबत त्यांच्या नवीन घरात आहेत. तर दुसऱ्या फोटोंमध्ये लीना दारावर कुंकुवाचे हात उमटवत आहेत. यासोबतच लीना यांनी त्यांच्या स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्या आणि मंगेश हातात करा घेऊन घरात प्रवेश करत आहेत.
लीना यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. नेटकरी प्रतिक्रिया देत या जोडप्याचं अभिनंदन करत आहेत.