मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कला आणि अद्वैतची तू तू मैं मैं थांबेना, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार

कला आणि अद्वैतची तू तू मैं मैं थांबेना, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 30, 2024 12:44 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत राहुलच्या लग्नामुळे कला आणि अद्वैत यांच्यामध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे दिसत आहे. पण दोघांनाही ते मान्य नाही.

कला आणि अद्वैतची तू तू मैं मैं थांबेना, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार
कला आणि अद्वैतची तू तू मैं मैं थांबेना, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेने सध्या धुमाकूळ घातला आहे. या मालिकेने टीआरपी यादीमध्ये अव्वळ स्थान पटकावले आहे. मालिकेतील कला आणि अद्वैतची जोडी सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. त्या दोघांनी महाराष्ट्रातील जनतेला अक्षरश: वेड लावले आहे. कला आणि अद्वैतचे लग्न झाल्यानंतर दोघांचे दोन मिनिटेही पटत नसल्याचे दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आबांनी दिले कला आणि अद्वैतला काम

राहुल आणि नैराच्या लग्नाची चांदेकर कुटुंबीय तयारी करताना दिसत आहेत. केवळ तीन दिवसांत त्यांच्या लग्नाची तयारी करण्याचा निर्णय आबांनी घेतला आहे. त्या दोघांच्या लग्नाची पूर्ण तयारी ही कला आणि अद्वैत यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यासाठी आबांनी त्यांना लागणाऱ्या गोष्टींची तसेच कामाची यादी करण्यास सांगितले आहे. कामाची यादी करण्यासाठी कला अद्वैतची डायरी घेते. अद्वैतला देखील तिच डायरी हवी असते. त्या डायरीवरुन दोघांमध्ये भांडण सुरु असते. शेवटी काकी दोघांना एका सल्ला देतात आणि दोघेही यादी करतात. कला डायरीमध्ये यादी करते तर अद्वैत लॅपटॉपवर यादी करतो. पण दोघांची यादी एकदम तंतोतंत सेम असते. त्यावरूनही दोघांमध्ये भांडण होते.
वाचा: अभिनेत्री जुई गडकरी हिला जेलमध्ये टाकण्याची धमकी, काय आहे नेमकी भानगड? जाणून घ्या

काकींनी दोघांनाही दिले काम

यादी करुन झाल्यावर कला अद्वैतला जेवणाचा मेनू ठरवण्यास सांगते. पण अद्वैत काही ऐकत नाही. त्याला घरातील डेकोरेशन ठरवायचे असते. तो डेकोरेशन ठरवण्यासाठी जाणार असतो. पुन्हा दोघांमध्ये तू तू मैं मैं सुरु होते. शेवटी काकी मध्यस्थी करतात आणि दोघांना एकत्र काम करायचे आहे याची जाणीव करुन देतात. तसेच दोघांनीही सर्वात आधी लग्नाला लागणाऱ्या साड्या घेऊन येण्याचा सल्ला देतात.
वाचा: अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

साडीच्या दुकानात दोघांमध्ये वाद

अद्वैत कलाला घेऊन एका मोठ्या दुकानात जातो. दोघेही साडी घेण्यासाठी बसतात. दाखवलेल्या साड्यांमधील एकच साडी दोघांना पण आवडते. कलाला पण तिच साडी आवडली म्हणून अद्वैत मला दुसरी साडी आवडली आहे असे खोटे बोलतो. शेवटी वैतागून कला सरांना ज्या साड्या आवडतील त्या दाखवा असे म्हणते. अद्वैत कलाने नेसलेल्या साडीचा पदर पकडतो आणि अशा प्रकारची साडी दाखवा असे म्हणतो. तेवढ्यात कला उठून निघून जाते. अद्वैतने साडीचा पदर पकडला असल्यामुळे कला त्याच्याकडे रागात पाहाते. आता मालिकेत पुढे काय होणार हे येत्या भागात कळेल.
वाचा: 'आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला', क्षिती जोग पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटावर बोलली

IPL_Entry_Point