मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय घडणार?

नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 02, 2024 01:28 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत रोज काही तरी नवीन घडत आहे. आता राहुलला नैना हिच्याशी लग्न करायचे नसते. त्यामुळे तो नवा डाव आखत असतो.

नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय घडणार?
नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय घडणार?

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत सध्या कलाची बहिण नैना आणि अद्वैतच्या आत्याचा मुलगा राहुलच्या लग्नाची तयारी सुरु आहे. या लग्नाची पूर्ण जबाबदारी आबांनी कला आणि अद्वैतच्या खांद्यावर सोपावली आहे. तीन दिवसात होणाऱ्या लग्नासाठी दोघेही कसून तयारी करताना दिसत आहेत. पण या दरम्यान दोघांमध्ये ही तू तू मैं मैं देखील सुरु आहे. आता 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

कलाने सरोज मॅडमशी थेट बोलली

कला चांदेकरांसाठी स्वयंपाक करुन बहिणीच्या लग्नाची रुकवत तयार करत बसते. तिला हे सगळे करता करता खूप उशिर होतो. या गोष्टीचा सरोज फायदा घेऊन सगळे जेवण गरीबांना वाटून टाकते. दुसऱ्या दिवशी सर्वांना कळते ते जेवणे सरोजने फेकले आहे. आबांना धक्का बसतो की असे का केले? कलाही चकीत होते. शेवटी वैतागून कला थेट सरोजशी बोलते. सरोजला राग येतो पण तरीही ती शांत बसते.
वाचा: चित्रपट पाहण्याचा विचार करत आहात? मग हे दोन मराठी सिनेमे चांगला पर्याय ठरु शकतात

कला आणि अद्वैतमध्ये कामावरुन भांडण

कला लग्नात काय जेवण असणार हे ठरवते. त्यानंतर तेछे अद्वैत येतो आणि तो देखील तोच मेनू सांगतो. अद्वैत आणि कलाचे तेथेही त्या माणसासमोर भांडण होते. कलाला ते खटकते. ते अद्वैतशी बोलायला जाते पण तेथेही दोघांचे जमत नाही. शेवटी कला मंगळसूत्र आणि इतर सोन्याच्या गोष्टींची जबाबदारी मी सांभाळते असे बोलते. पण अद्वैत तेही ऐकायला तयार नसतो. शेवटी सगळी जबाबदारी ती अद्वैतवर सोपावून निघून जाते.
वाचा: 'विकृत चाळे' म्हणून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्री हेमांगी कवीचे सडेतोड उत्तर

राहुल आखणार नवा प्लान

राहुलला नैनाशी लग्न करायचे नसते. पण नैना गर्भवती असल्यामुळे सगळे लग्नाला तयार होतात. राहुल आईशी बोलत असतो की त्याला हे लग्न करायचे नसते. त्याची आई त्याला कही तरी प्लान करायला सांगते जेणेकरुन हे लग्न मोडले जाईल. ती लग्नाच्या मांडवात पोहोचणार नाही याची सोय राहुलला करायला सांगते. तेवढ्यात कला तेथे पोहोचते. आता कलाने हे सगळे ऐकले की नाही हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
वाचा: कार्तिकने घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यास दिला नकार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असणार सागरचे पुढचे पाऊल

IPL_Entry_Point