स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अद्वैत चांदेकर आणि कला खरे ही जोडी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दोघांमध्ये सतत सुरु असलेली तू तू मै मै प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आबा प्रयत्न करत आहेत. चला जाणून घेऊया 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार...
ब्रह्मनाथन या उद्योगपतीसोबत अद्वैतची एक बिझनेस मिटिंग असते. पण अद्वैतने सादर केलेले एकही डिझाइन त्यांना आवडत नाहीत. शेवटी कला अद्वैतची मदत करायला पुढे सरसावते. ती रात्रभर बसून नवे डिझाइन काढते. पण याची अद्वैतला जराही भनक लागू देत नाही. ते डिझाइन पाहून ब्रह्मनाथन खूश होतात आणि अद्वैतसोबत डील करतात. अद्वैतला डील मिळाली हे पाहून सर्वजण खूश होतात. आबा कलामुळेच डील मिळाल्याचे बोलतात. पण अद्वैतला ते पटत नाही.
वाचा: अरे हाय काय अन् नाय काय;'गेला माधव कुणीकडे' नाटक पुन्हा पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा
आधीच्या लग्नासाठी आणि आता नैनाच्या लग्नासाठी कलाच्या आई-वडीलांनी कर्ज घेतलेले असते. त्याचा हफता न दिल्यामुळे ते खरेंच्या घरी येतात. ते कलाच्या आईला हफ्ते का भरले नाहीत असे विचारतात. पण त्या मुदत मागत असल्यामुळे शेवटी कलाची गाडी ते उचलून घेऊन जातात. काजू ती गाडी परत आणण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला आई समजावते आणि सगळं काही बदलते.
वाचा: 'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक
घरातील पेस्टकंट्रोल झाल्यानंतर आता कला पुन्हा तिच्या रुममध्ये राहायला जाणार असते. अद्वैत तिचे सगळे सामान घेऊन खोलीतून बाहेर पडतो. दोघेही कलाच्या खोलीजवळ जातात तेव्हा तिथे लॉक लावलेला दिसतो. ते पाहून दोघेही चकीत होतात. आबा घरातील सामान त्या खोलीत आणून टाकतात. त्यामुळे कलाला तेथे राहण्याची ते परवानगी देत नाहीत. ते कलाला पुन्हा अद्वैतच्या खोलीत राहण्यासाठी सांगतात. सरोजला ते आवडत नाही. पण आबांच्या पुढे कोणीही बोलू शकत नाही. त्यामुळे त्या देखील आबांचा शब्द पळतात.
वाचा: सागरने सांगितले आदित्यते सत्य, काय असणार मुक्ता आणि माधवीची प्रतिक्रिया? ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये काय घडणार