काजूला सोहमच्या खोलीत पाहून कलाला बसला धक्का, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  काजूला सोहमच्या खोलीत पाहून कलाला बसला धक्का, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?

काजूला सोहमच्या खोलीत पाहून कलाला बसला धक्का, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published May 21, 2024 04:15 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत सध्या एक वेगळे वळण आले आहे. कलाने काजूला सोहमच्या खोलीत पाहिले. त्यामुळे आजच्या भागात काय घडणार जाणून घ्या...

laxmichya paulanni: कलाने काजूला चांगलेच बजावले
laxmichya paulanni: कलाने काजूला चांगलेच बजावले

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेतील अद्वैत चांदेकर आणि कला खरे या जोडी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यांची ही जोडी प्रेक्षकांची नेहमीच मने जिंकत आली आहे. नियतीने त्यांचे लग्न तर जुळवून आणले पण दोघेही सतत भांडताना दिसतात. पण चांदेकर कुटुंबीयांना आता त्यांच्या भांडणाची चांगलीच सवय झाली आहे. चला जाणून घेऊया 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार.

कलाने काजूला खडसावले

कलाची सर्वात धाकटी बहिण काजूचा पेपर असतो. पण तिचा काहीच येत नसतं. त्यामुळे ती मध्यरात्री कलाकडे येण्याचा निर्णय घेते. तेवढ्यात बाहेर तिला सोहम दिसतो. त्याला पाहून ती आनंदी होते. दोघेही सोहमच्या खोलीमध्ये बसतात. सोहम काजूला गणिते सोडवण्यात मदत करत असतो आणि काजून सोहमचे राहिलेले चित्र पूर्ण करत असते. दरम्यान दोघांमध्ये मजामस्ती सुरु होते. पण त्यांचा आवाज अद्वैत आणि कलाच्या खोलीपर्यंत जातो. कला काजूला चांगलेच सुनावते. तसेच अद्वैत सोहमला काजूला घरी सोडून ये असे बजावतो.
वाचा: आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

सोहमची गाडी रस्त्यात पडली बंद

काजूला इतक्या उशिरा एकटीला घरी पाठवण्यापेक्षा अद्वैतने सोहमला तिला सोडून येण्यास सांगितले. घरी जात असताना वाटेत सोहमची गाडी बंद पडते. सोहमला साधे गाडीचे बोनेटही उघडता येत नाही. काजू खाली उतरतने आणि गॅरेजमध्ये असलेल्या एका मित्राला विचारुन गाडी रिपेअर करते. सोहम तिच्याकडे एकटक पाहात असतो. काजू त्याला केस बांधायला सांगते. पण सोहमला ते देखील जमत नाही. शेवटी वैतागून काजूच तिचे केस बांधते. सोहमच्या मनात काजू विषयी प्रेम खुलताना दिसत आहे. आता खरेंची आजून एक मुलगी चांदेकरांच्या घरी सून म्हणून जाणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

कला आणि अद्वैतमध्ये तू तू मै मै सुरुच

कला ही सध्या अद्वैतच्या खोलीत राहात आहे. पण दोघांमध्ये सारखे भांडण सुरु असल्याचे दिसत आहे. दोघेही भांडणाच्या नादात झोपत नाहीत. सकाळी लवकर उठून कला शेवटी कामाला लागते. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: अभिनेत्री यामी गौतमच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, बाळाचं नाव ऐकलंत का?

Whats_app_banner