'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत सध्या कलाची बहिण नैना आणि अद्वैतचा भाऊ राहुलच्या लग्नाची तयारी सुरु आहे. या लग्नाची पूर्ण जबाबदारी आबांनी कला आणि अद्वैतवर सोपावली आहे. तीन दिवसात होणाऱ्या लग्नासाठी दोघेही कसून तयारी करत आहेत. पण या दरम्यान दोघांमध्ये ही तू तू मैं मैं सुरु असल्याचे दिसत आहे. आता 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार जाणून घेऊया...
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही कला आणि अद्वैत साडी खरेदी गेल्या असल्यापासून होते. पण कलाला पसंत पडलेली साडी घेण्यास अद्वैत नकार देतो आणि तिच्याशी भांडत बसतो. शेवटी कलाच वेगळ्या मार्गाचा अवलंब करते. ती समोर असलेली साडी जराही आवडलेली नाही असे म्हणते. ते ऐकून अद्वैत मुद्दाम ती साडी खरेदी करतो. या सगळ्यात साड्या खरेदीचे एक काम कलामुळे पटकन पूर्ण होते.
वाचा: घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा
राहुल आणि नैना या दोघांचे लग्न होणार असले तरी त्यांच्यामध्ये प्रेमाची भावना नाही. नैना दुकानात जाऊन ८० हजार रुपयांच्या साड्या खरेदी करते आणि त्याचे बिल राहुलच्या ऑफिसमध्ये पाठवते. ते बिल भरण्यास राहुल नकार देतो. पण नैना त्याला ते पैसे द्यायला लावते. आता त्या दोघांचे खरच लग्न होणार की राहुल लग्नाच्या मांडवातून पळून जाणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: 'लोकांना लाज का वाटत नाही', इंटीमेट सीनवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीने सुनावले
कला चांदेकरांसाठी स्वयंपाक करुन बहिणीच्या लग्नासाठी रुकवत तयार करत बसते. तिला हे सगळं करता करता ११ वाजतात. या गोष्टीचा सरोज फायदा घेते. अद्वैत मिटिंगसाठी बाहेर गेलेला असतो. त्यामुळे सरोज घरातील सगळे जेवण गरीबांना देऊन टाकते. जेव्हा कला जेवायला येते तेव्हा स्वयंपाक घरात अन्नाचा कण नसतो. ती पाणी पिऊन झोपायला जाते. तेवढ्यात अद्वैत येतो आणि जेवण विचारतो. कला देवाला ठेवलेला नैवेद्य त्याला देते. दोघेही तो खातात. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळते. तेव्हा सरोज मान्य करते की तिने उरलेले जेवण गरीबांना दिले. आता यावर अद्वैतची प्रतिक्रिया काय असणार? हे आगामी भागात कळणार आहे.
वाचा: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, खरेदी केले नवे घर