'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत खरेंच्या दोन्ही मुलींना चांदेकरांच्या घरी येऊन बऱ्याच गोष्टींमध्ये समजून घ्यावे लागत आहे. खास करुन कलाला खूप मेहनत करावी लागत आहे. नैना मात्र ऐशो आरामाचे आयुष्य जगत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया...
काजोल घरची परिस्थिती पाहून नोकरीच्या शोधात असते. ती सोहमकडे नोकरी मागत असते पण त्यांचे बोलणेच होत नाही. शेवटी कॅफेमध्ये तिला नोकरी मिळते. आज काजोलच्या कामाचा पहिला दिवस आहे. ती कॅफेची साफसफाई करुन पिझ्झा डिलिवरीसाठी जाते. सोहम ते पाहातो. सोहम त्या कॅफेच्या मॅनेजकडे जाऊन पिझ्झाची ऑर्डर देतो आणि काजोलला मदत करतो.
वाचा: 'जुनं फर्निचर' सिनेमा घरबसल्या पाहायचाय? मग ही बातमी नक्की वाचा
नैनाला तिसरा महिना सुरु झाला असेल याची आठवण कलाला होते. ती सर्वांसमोर कलाला काय खायचं आणि काय नाही याची आठवण करुन देते. तेवढ्यात रजनी देखील तिला सोनोग्राफीची आठवण करुन देते. आबा कोल्हापूरातील सर्वात मोठ्या डॉक्टरांकडे नैना जाण्यास सांगतात. पण इतर कोणत्याही डॉक्टरकडे गेली तर सत्य सर्वांसमोर येईल असे नैनाला वाटते. त्यामुळे ती नकार देते.
वाचा: अस्सल मातीतील कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार; 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
कलाच ते डिझाइन काढत असल्याची शंका अद्वैतला आली आहे. त्यामुळे तो ऑफिसमधून कलाला फोन लावायला सांगतो. पण कला देखील हुशार आहे. ती आवज बदलून अद्वैतशी बोलत असते. पण तरीही अद्वैतच्या मनात शंका कायम आहे. येत्या भागात अद्वैत कलाचे सत्य सर्वांसमोर आणणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणारी 'गूगल आई', पाहा उत्सुकता वाढवणारा टीझर
नैना कायमच तिचा मित्र सौरभची मदत घेत असते. तिने सौभला लग्न करण्याचे वचन दिले आहे. पण आता नैनाला सोनोग्राफी करायला सांगितल्यावर सौरभची मदत लागत आहे. ती सौरभला फोन करते. सौरभ तिला कॅफेमध्ये भेटायला बोलावते. राहुल हे सगळं चोरुन ऐकतो. तो तिच्या मागे जातो. त्यांना कॅफेमध्ये पाहातो. राहुल नैना आणि सौरभविषयी घरातील सर्वांना सांगतो.
संबंधित बातम्या