Laxmichya Paulanni Serial Update: स्टार प्रवाह वाहिनीवर २० नोव्हेंबर २०२३ रोजी सुरु झालेली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत अभिनेत्री ईशा केसकर व अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता मालिकेचा सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये कला आणि अद्वैतने घेतलेल्या उखाण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये लग्नानंतर अद्वैत पहिल्यांदाच कलाच्या घरी जातो. कलाची आई दोघांचेही औक्षण करते आणि घरात घेते. तेवढ्यात जमा झालेले शेजारी दोघांनाही उखाणा घेण्याचा अग्रह करतात. त्यावेळी दोघांनी घेतलेला उखाणा ऐकून सर्वांना हसू अनावर झाले आहे.
वाचा: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला जावई बनण्यास बोनी कपूरचा नकार?
अद्वैत उखाणा घेत म्हणातो, “लग्न मांडवात घरची मंडळी हिच्यावरच अडली आणि खरेंची कला गळ्यातच पडली.” त्यानंतर कला देखील अद्वैतच्या तोडीस तोड उखाणा घेते. कला म्हणते, “नाकावर राग आणि गालांचे फुगे, इगो घेऊन बाजूला अद्वैत राव उभे, माहिती नाही अजून काय-काय सहन करावं लागणार आहे मला, पण पुरुन उरले तुम्हाला ही कला.”
वाचा: ऑस्कर न मिळवणाऱ्यांसाठी बम्पर गिफ्ट! १.४ कोटींच्या ‘गुडी बॅग’ मध्ये नेमकं काय?
कला-अद्वैतचा हा भन्नाट उखाणा नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिल आहे, “रॉकिंग कला-अद्वैत. तुमची जुगलबंदी जगात भारी आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “अरे ही कमाल जोडी आहे. टॉम अँड जेरी सारखे भांडणं करतात. सुरुवातीला अद्वैत आवडत नव्हता पण आता लय आवडतो. जगात भारी जोडी आहे.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “शेरास सव्वाशेर.”
वाचा: ती नाचण्याची जागा नाही; नोराचा मेट्रोमधील 'सैराट'वर डान्सपाहून नेटकरी संतापले
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सुरु झाल्यापासून टीआरपी यादीमध्ये अव्वळ स्थानावर आहे. कधी ही मालिता चौथ्या क्रमांकावर असते तर कधी तिसऱ्या. या मालिकेत दिवसेंदिवस रंजक वळण येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबात उत्सुकता वाढते.
संबंधित बातम्या