मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: लॉरेन्स बिष्णोईने तुरुंगातून दिली सलमान खानला धमकी, भाईजान मागणार माफी?

Salman Khan: लॉरेन्स बिष्णोईने तुरुंगातून दिली सलमान खानला धमकी, भाईजान मागणार माफी?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 15, 2023 02:07 PM IST

काँग्रेस नेता आणि गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणा गँगस्टर लॉरेंस बिष्णोई हा मुख्य गुन्हेगार आहे. आता त्याने एका मुलाखतीमध्ये सलमानला धमकी दिली आहे.

सलमान खान
सलमान खान

काँग्रेस नेता आणि गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणा गँगस्टर लॉरेंस बिष्णोई हा मुख्य गुन्हेगार आहे. आता कुख्यात गुंड लॉरेन्सने पंजाब जेलमधून एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी दिली आहे. जर सलमानने माफी मागितली नाही तर परिणाम वाईट होतील असे लॉरेंसने म्हटले आहे.

लॉरेंसने एबीपी न्यूजला पंजाब तुरुंगातून मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये लॉरेंसचा समुदाय हा सलमानवर नाराज असल्याचे सांगितले. कारण सलमानने त्यांना अपमानित केले होते. 'सलमान विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्या प्रकरणात सलमानने माफी मागितली नाही. जर सलमानने माफी मागितली नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील. मी कोणावर अवलंबून राहणार नाही' असे लॉरेंसने म्हटले.
वाचा: अण्णा इज बॅक! सुनील शेट्टीच्या 'हंटर' सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?

जम्बेश्वरजी मंदिर आधी बिष्णोई समुदायाने सलमानला माफी मागण्यासाठी बोलावले आहे. जर सलमान तेथे जाऊन सर्वांची माफी मागितली तर त्याला माफ केले जाईल असे लॉरेंसने म्हटले आहे. 'सलमानने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन माफी मागितली पाहिजे. जर आमचा समाज त्याला माफ करणार असेल तर मी कधीच सलमानला नुकसान पोहोचवणार नाही' असे लॉरेंज म्हणाला.

लॉरेंसने पंजाबी गायक आणि कॉंग्रेस नेता सिद्धू मूसेवालाची हत्या केल्याची कबूली दिली. मात्र, सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना कोणतीही धमकी दिली नसल्याचे त्याने म्हटले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याला Y+ सुरक्षा देण्यात आली होती. सलमानने बुलेट प्रूफ कार वापरण्यास सुरुवात केली होती. तसेच घराबाहेरील सुरक्षा देखील वाढवली होती.

IPL_Entry_Point

विभाग