Video : 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यचा अपघात, चेहऱ्यावर आली आग-laughter chefs unlimited entertainment rahul vaidya cought in accident see video ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video : 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यचा अपघात, चेहऱ्यावर आली आग

Video : 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यचा अपघात, चेहऱ्यावर आली आग

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 22, 2024 10:36 AM IST

Viral Video: नुकताच 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर अभिनेत्री रीम शेखसोबत मोठा अपघात झाला होता. त्यानंतर आता गायक राहुल वैद्यसोबत देखील असाच काहीसा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Laughter Chefs
Laughter Chefs

Laughter Chefs Mishappening with Rahul Vaidya: कलर्सचा रिअॅलिटी शो 'लाफ्टर शेफ' सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना भरपूर कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. अनेक टीव्ही कलाकार आपल्या उपस्थितीने या शोला चार चाँद लावताना दिसतात. पण यादरम्यान कुकिंग शोबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. नुकताच 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर अभिनेत्री रीम शेखसोबत मोठा अपघात झाला होता. त्यापाठोपाठ गायक राहुल वैद्य देखील अपघाताला बळी पडला आहे. अचानक आग राहुलच्या अंगावर आली आहे.

नेमकं काय झालं पाहा

कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'लाफ्टर शेफ'चा प्रोमो शेअर केला आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, राहुल वैद्य आपला जोडीदार अली गोनीसोबत स्वयंपाक करत असताना त्याच्या चेहऱ्यावर आगीचा भडका येतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला राहुलचा आरडाओरडा करतानाचा आवाज येईल. त्याचबरोबर बाकीचे स्पर्धकही इतके घाबरतात की तेही ओरडू लागतात. राहुलची अवस्था पाहून निया शर्मा आणि जन्नत जुबेर यांच्या हातातून जेवण सटकते. हा व्हिडिओ खरोखरच भीतीदायक आहे. सध्या राहुल ठीक आहे, त्याला फारशी गंभीर दुखापत झालेली नाही. तो थोडक्यात बचावला आहे.

राहुल वैद्यच्या आधी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रीम शेख यांचाही 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर अपघात झाला होता. राहुल बचावला पण रीमच्या चेहऱ्याला जबर दुखापत झाली होती. रीम स्वयंपाक करत असताना तिच्या चेहऱ्यावर गरम तेलाचे ठिपके पडले, ज्यामुळे डोळ्याजवळ तिच्या चेहऱ्यावर खुणा आल्या. नुकतेच रीमने तिच्या लेटेस्ट फोटोंद्वारे तिच्या चेहऱ्याची अवस्था दाखवली. या संपूर्ण अपघाताचा उल्लेखही तिने केला होता. या फोटोंमध्ये त्याच्या चेहऱ्यावर अनेक डाग आणि खुणा स्पष्ट दिसत आहेत.
वाचा : ७० दिवसातच ‘बिग बॉस मराठी ५’ घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'या' दिवशी होणार फिनाले

कोणते स्पर्धक आहेत सहभागी

'लाफ्टर शेफ' हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवर सुरु आहे. या कार्यक्रमात सहा जोड्या स्वयंपाक करताना दिसत आहेत. त्यामध्ये कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा, जन्नत जुबेर आणि रीम, अली गोणी आणि राहुल वैद्य, अर्जुन बिजलानी आणि करण कुंद्रा, अंकिता लोखंडे आणि विकी जैन, निया शर्माची जोडी दिसत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सिंह करताना दिसत आहे. आता सेटवर झालेल्या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला.

Whats_app_banner
विभाग