मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 20 Aug 202403:58 PM IST
Entertainment News in Marathi: सैफ अली खानवर दिल्लीतील नाइट क्लबमध्ये झाला होता हल्ला, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Saif Ali Khan: आज आम्ही तुम्हाला सैफ अली खानशी संबंधित एक किस्सा सांगत आहोत. हा किस्सा खुद्द सैफने चार वर्षांपूर्वी एका चॅट शोमध्ये सांगितला होता.
Entertainment News in Marathi: अक्षय कुमारपेक्षा १ रुपया जास्त मागितल्यामुळे संजीव कपूरला मास्टरशेफमधून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता
मास्टर शेफ इंडिया या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये अक्षय कुमार हा परीक्षक म्हणून दिसत होता. त्याच्यासोबत शेफ संजीव कपूरला विचारणा करण्यात आली होती. मात्र, संजीव कपूर यांनी अक्षयपेक्षा १ रुपया जास्क मागितल्यामुळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
Entertainment News in Marathi: Badlapur Case : चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या! मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप
Badlapur Minor Girl Abuse Case : बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सर्वजण संताप व्यक्त करत आहेत. आता मराठी कलाकारांनी तर थेट फाशी देण्याची मागणी केली आहे.
Entertainment News in Marathi: Angry Young Men review: सिनेसृष्टीचे सत्य सांगत सलीम-जावेद यांनी सांगितली आपली कथा
Angry Young Men review: सलीम खान आणि जावेद अख्तर यांची डॉक्यु सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये दोघांच्या प्रोफेशनल लाईफची कहाणी दाखवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया ही सीरिज नेमकी कशी आहे...
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: सायलीला अश्रू अनावर! अर्जुन पुसणार डोळे; ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये नेमकं काय झालं?
Tharala Tar Mag 20 August 2024 Serial Update: प्रतिमा आत्यांना त्यांच्या आठवणी परत मिळाव्यात आणि त्या आपल्या कुटुंबात आनंदाने राहाव्यात म्हणून सायली शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे.
Entertainment News in Marathi: सिनेमांमध्ये रोल मिळवण्यासाठी अभिनेत्रींना करावी लागतात 'ही' मनाविरुद्ध कामे..; अहवालामुळे सिनेइंडस्ट्रीत खळबळ
मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिला कलाकारांना संधींच्या बदल्यात लैंगिक संबंधांची मागणी केली जाते, तडजोड करण्यास सांगितले जाते, असे नुकत्याच एका अहवालातून समोर आले आहे.
Entertainment News in Marathi: Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरी रुग्णालयात दाखल, व्हायरल फोटोमुळे चाहते पडले काळजीत!
Jui Gadkari Hospitalised: अभिनेत्री जुई गडकरी ही रुग्णालयात दाखल झाली आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. मात्र, तिला नेमकं काय झालं आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही.
Entertainment News in Marathi: Bigg Boss: 'तू पण भवऱ्यासारखी फिरतेय', अभिजीतमुळे अरबाज अन् निक्कीच्या मैत्रीत फूट
Bigg Boss Marathi 5 Update: बिग बॉस मराठी ५च्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की आणि अरबाजची मैत्री पाहायला मिळत होती. पण आता अभिजीतमुळे त्या दोघांमध्ये भांडण झाले आहे.
Entertainment News in Marathi: Shriyut Non Maharashtrian: नोकरी भरतीतही होतोय भ्रष्टाचारावर; थेट भाष्य करणार ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’! पाह टीझर
Shriyut Non Maharashtrian Marathi Movie Teaser Out: अगदी हातावर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी अनेकदा हजारोंच्या घरात अर्ज येतात. आपल्या समाजातील हे भयाण वास्तव आहे.
Entertainment News in Marathi: KBC 16: लग्नानंतर जया यांना प्रेमाने काय म्हणायचे अमिताभ बच्चन? ‘केबीसी १६’च्या मंचावर सांगितला गोड किस्सा!
Amitabh Bachchan Love Story On KBC: अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला ४० वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी आजही बिग बी आपल्या पत्नीबद्दल आणि त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल क्यूट किस्से सांगत असतात.
Entertainment News in Marathi: Chhaava Teaser: विकी कौशलच्या ‘छावा’चा टीझर पाहून कतरिना कैफलाही भरली धडकी! नवऱ्याचं कौतुक करत म्हणाली...
Katrina kaif On Chhaava Teaser: कतरिना कैफने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘छावा’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. यासोबतच तिने या टीझरचे तोंडभरून कौतुक केले आहे.
Entertainment News in Marathi: Shreyas Talpade: वाऱ्यासारखी पसरली श्रेयस तळपदेच्या निधनाची बातमी; अभिनेता झाला हैराण! पोस्ट लिहित म्हणाला...
Shreyas Talpade Death News: सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे याच्या मृत्यूची खोटी बातमी देण्यात आली होती. ही बातमी पाहून श्रेयसच्या चाहत्यांना धक्काच बसला होता.