मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lata Mangeshkar: क्रिकेटपटूच्या प्रेमात होत्या लता मंगेशकर, 'या' कारणामुळे राहिल्या अविवाहित

Lata Mangeshkar: क्रिकेटपटूच्या प्रेमात होत्या लता मंगेशकर, 'या' कारणामुळे राहिल्या अविवाहित

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 06, 2024 08:19 AM IST

Lata Mangeshkar Death Anniversary : भारताच्या गानकोकीळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही गोष्टी...

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar

Lata Mangeshkar Personal Life: भारताच्या गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांचा आज ६ फेब्रुवारी रोजी दुसरा स्मृतिदिन. आज लता दीदी आपल्यामध्ये नसल्या तरी यांच्या गाण्यांची जादू प्रेक्षकांवर कायम असणारच आहे. त्यांना जाऊन दोन वर्ष पूर्ण झाली, तरीही त्या आपल्यात नाही या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण जाते. आपल्या सुमधुर आवाजाने आणि गोड हास्याने त्यांनी चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली होती. पण तुम्हाला माहिती आहे का लता मंगेशकर यांनी लग्न का केले नाही? त्या एका क्रिकेटपटूच्या प्रेमात होत्या. हो तुम्ही बरोबर ऐकलत. आता हा क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ डिसेंबर १९२९ साली मध्य प्रदेश येथील इंदोर येथे झाला. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी मेहनत करत स्वत:च विश्व उभं केले. त्यांनी जवळपास ३० भाषांमध्ये १० हजारपेक्षा जास्त गाणी गायिली. १९८९ साली त्यांना दादा साहेब फाळके या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर २००१ साली त्यांना भारत रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वाचा: मालिकाविश्व गाजवणारी जुई गडकरी आहे '11th Fail', स्वत: केला खुलासा

आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांनी लग्न का केले नाही? असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात येतो. असे म्हटले जाते की लता दीदी या एका क्रिकेटपटूच्या प्रेमात होत्या. त्यांनी प्रेमाची देखील कबूल दिली होती. मात्र त्यांचे प्रेम त्यांना मिळू शकले नाही.

क्रिकेटपटूचा प्रेमात लता मंगेशकर

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, लता मंगेशरकर डूंगरपूर राजघराण्यातील महाराजा राज सिंह यांच्या प्रेमात पडल्या होत्या. मात्र राज सिंह यांनी आई-वडिलांनी सर्वसामान्य मुलीशी लग्न करणार नाही असे वचन दिले होते. महाराजा राज सिंह हे लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचे मित्र होते. राज सिंह यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. ते १६ वर्षे फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायचे. जवळपास २० वर्षे ते भारतीय क्रिकेट बोर्डचे सदस्य होते. दोन वेळा त्यांची नॅशनल टीममध्ये निवड झाली होती. आणि चार वेळा ते विदेश दौऱ्यावर देखील गेले होते.

पहिलं गाणं प्रदर्शित झाले नाही

लता मंगेशकर यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत तब्बल ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मात्र, लता मंगेशकर यांनी गायलेलं पहिलं गाणं मात्र कधीच रिलीज होऊ शकलं नाही. या गाण्याचा किस्सा देखील खूप खास आहे. लता मंगेशकर यांनी कधीच चित्रपटात गाणी गाऊ नयेत अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, तरीही लता मंगेशकर यांनी एका चित्रपटासाठी पहिलंवहिलं गाणं गायलं. मात्र, त्यांचं हे गाणं कधीच रिलीज होऊ शकलं नाही.

WhatsApp channel

विभाग