मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lata Mangeshkar Ram Aayenge: लता मंगेशकर यांच्या आवाजात 'राम आएंगे', AIची कमाल

Lata Mangeshkar Ram Aayenge: लता मंगेशकर यांच्या आवाजात 'राम आएंगे', AIची कमाल

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 22, 2024 01:43 PM IST

Lata Mangeshkar Ram Aayenge Song: गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजील 'राम आएंगे' एआय-जनरेटेड गाणे नुकताच युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar

आज संपूर्ण देश हा राममय झाला आहे. एक मोठ्या संघर्षानंतर रामजन्मभूमीत पुन्हा एकदा जल्लोषात प्रभू रामाचे स्वागत होत असल्यामुळे देशभरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. आयोध्येत प्रभू श्रीरामाचा मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला देशातील दिग्गज लोक उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सोशल मीडियावर भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील 'राम आएंगे' गाण्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या आनंद साजरा करण्यासाठी देशातील अनेक गायकांची भजन गायले आहे. पण लता मंगेशकर यांच्या आवाजातील एआय जनरेटेड 'राम आएंगे' भजन ऐकून लोक आनंदी झाले आहेत. एका यूजरने त्याच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर करत कमेंट केल्या आहेत.
वाचा: पाऊले चालती अयोध्येची वाट! आलिया-कतरिनासह बॉलिवूड कलाकार अयोध्यला रवाना

पहिल्यांदा एआयचा योग्य वापर झाल्याची भावना अनेकांनी लता मंगेशकर यांच्या आवाजातील 'राम आएंगे' गाणे शेअर व्यक्त केली आहे. सर्वात आधी ज्या यूजरने हे गाणे शेअर केले त्याने, 'हा नॉन कमर्शिअल व्हिडीओ योग्य उपयोगांतर्गत ट्रान्सफॉरमेशन उद्देशांसाठी सिंथेटिक आवाजात सादर करत आहोत. खास व्यक्तींची नक्कल करण्याचा कोणताही उद्देश नाही. हा ओपन सोर्स टूल आणि माझ्या साऊंड इंजिनिअरिंगच्या मिश्रणाचा मिलाप आहे. संगीत आणि त्याच्या रचनाकारांच्या प्रति सन्मान आणि प्रशंसेसह हा तयार करण्यात आला आहे'

मंदिर उद्घाटनातील कार्यक्रमांचा तपशील

या कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील बासरी व ढोलक, कर्नाटकातील वीणा, महाराष्ट्रातील सुंदरी, पंजाबमधील अलगोजा, ओडिशातील मर्दाला. महला, मध्य प्रदेशातील संतूर, मणिपूरमधील पुंग, आसाममधील नगारा आणि काली, छत्तीसगडमधील तंबुरा, बिहारमधील पखाकज, दिल्लीतील शहनाई आणि राजस्थानमधील रावणहल्य या कलाकारांचा समावेश असेल.

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी आपला निकाल देताना वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्याचे आणि अयोध्येतील महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जमीन मुस्लिमांना देण्याचे आदेश दिले होते. डिसेंबर १९१९२ मध्ये कारसेवकांनी वादग्रस्त जागेवर असलेली बाबरी मशीद पाडली होती.

WhatsApp channel