अभिनेता ललित प्रभाकर याने गायले 'ससा रे ससा' गाणे, पाहा व्हायरल झालेला मजेशीर व्हिडीओ
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिनेता ललित प्रभाकर याने गायले 'ससा रे ससा' गाणे, पाहा व्हायरल झालेला मजेशीर व्हिडीओ

अभिनेता ललित प्रभाकर याने गायले 'ससा रे ससा' गाणे, पाहा व्हायरल झालेला मजेशीर व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 29, 2024 08:16 AM IST

मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो 'ससा रे ससा' हा गाणे गाताना दिसत आहे.

अभिनेता ललित प्रभाकर याने गायले 'ससा रे ससा' गाणे, पाहा व्हायरल झालेला मजेशीर व्हिडीओ
अभिनेता ललित प्रभाकर याने गायले 'ससा रे ससा' गाणे, पाहा व्हायरल झालेला मजेशीर व्हिडीओ

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे 'ललित प्रभाकर.' या मालिकेतील ललित आणि प्राजक्ता माळीची जोडी तुफान हिट ठरली होती. ललितने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याची प्रत्येक भूमिका ही कायमच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडताना दिसली. सध्या ललित एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

ललित प्रभाकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत चाहत्यांसोबत संवाद साधताना, त्याच्या खासी आयुष्यातील काही गोष्टी शेअर करताना, तसेच आगामी प्रोजेक्टविषयी माहिती देताना दिसतो. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलवर्स देखील आहे. सध्या सोशल मीडियावरचा ललितचा एक मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर कलाकारांपासून ते नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहे.
वाचा: सलूनच्या बाहेर स्वत:चा फोटो पाहून संतोष जुवेकरने केली मेजशीर पोस्ट, म्हणाला 'अपून तो हिरो बनगया!'

काय आहे व्हिडीओ?

ललितने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ललितचा भाऊ आकाश प्रभाकर दिसत आहे. आकाशच्या हातात गिटर आहे आणि तो ते वाजवताना दिसत आहे. पाठीमागे ललित बसला आहे. त्याने पट्ट्यांचा फिकट रंगाचा शर्ट परिधान केला आहे आणि क्रिम रंगाची पँट. त्यावर त्याने गॉगल लावला आहे. आकाश गिटार वाजवत असतो. त्यानंतर ललित गाणे गाणार असतो. पण अचानक ललित ठरलेले गाणे न गाता 'ससा रे ससा' हे गाणे गाताना दिसत आहे. ते ऐकून आकाशला हसू अनावर झाले आहे. हा व्हिडीओ शेअर करत ललितने 'माझा भाऊ आकाश प्रभाकरसोबत झालेले माझे सर्वात पहिले जेमिंग सेशल अतिशय आनंद देणारे होते. मला ही संधी दिल्याबद्दल तुझे खूप मनापासून आभार' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा: बायकोचं सामान उचलून कुशल बद्रिके निघाला फिरायला, मजेशीर फोटो शेअर करत म्हणाला...

कलाकारांनी केल्या मजेशीर कमेंट

सोशल मीडियावर आकाश आणि ललितचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. सारंग साठेने या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी वापरुन कमेंट केली आहे. तर अभिनेत्री शर्मिठा राऊतने 'भावड्या' असे म्हणत हसण्याचे इमोजी वापरले आहेत. एका नेटकऱ्याने मजेशीर अंदाजात 'गेला ससा पळून' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'श्या यार.. मस्त जेमिंग करत होता आणि ससा कुठून आणला? हसले मी पण खूप' अशी कमेंट केली. सध्या सोशल मीडियावर ललितचा हा व्हिडीओ धुमाकूळ घातल आहे.
वाचा: लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

Whats_app_banner