Lakhat Ek Amcha Dada: सूर्या आणि सिद्धार्थचा आमना-सामना; तुळजा शत्रूपासून करु शकेल का पतीचे रक्षण?-lakhat ek amcha dada serial 25th september 2024 update ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lakhat Ek Amcha Dada: सूर्या आणि सिद्धार्थचा आमना-सामना; तुळजा शत्रूपासून करु शकेल का पतीचे रक्षण?

Lakhat Ek Amcha Dada: सूर्या आणि सिद्धार्थचा आमना-सामना; तुळजा शत्रूपासून करु शकेल का पतीचे रक्षण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 25, 2024 12:19 PM IST

Lakhat Ek Amcha Dada : 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत आता सूर्या आणि सिद्धार्थचा आमना-सामना होणार आहे. चला जाणून घेऊया मालिकेत पुढे काय होणार?

Lakhat Ek Amcha Dada
Lakhat Ek Amcha Dada

Lakhat Ek Amcha Dada Latest Update: छोट्या पडद्यावर नव्याने दाखल झालेल्या मालिकांमध्ये ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा समावेश आहे. मालिकेत सूर्या दादा बनलेला नितीश चव्हाण सगळ्यांची मने जिंकताना दिसत आहे. अभिनेत्री दिशा परदेशी ही या मालिकेत ‘तुळजा’ बनली आहे. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. सूर्या आणि तुळजाने लग्न केले आहे. लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले आहे. या वादळाचा दोघेही कसा सामना करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

सिद्धार्थ घेणार सूड

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत सूर्याच्या घरामध्ये तुळजा रुळू पाहतेय. तिचं आणि तिच्या नणंदा मध्ये नवीन नातं फुलताना दिसतंय. पण दुसरीकडे तुळजाचा भाऊ, शत्रू त्याला भयंकर त्रास होतोय आणि तो सूडभावनेने सूर्या वरती पुन्हा एकदा हल्ला करायचं ठरवतो. या हल्ल्यामध्ये दादाला दुखापत होणार पण दादा थोडक्यात पुन्हा एकदा बचावतो.

भाग्यश्रीला सतावते काळजी

भाग्यश्रीला मात्र दादाची भयंकर काळजी वाटतेय. ती दादाला काहीही न करण्याचा आणि घराबाहेर न पडण्याचा सल्ला देते. सूर्याही तिला दिलासा देतो की काळजी करू नकोस मला काही होणार नाही. पण सूर्याच्या अपघातानंतर तुळजाच्या मनात प्रश्न येतात की कोणीतरी खरंच आपल्यावरती नजर ठेवून आहे, ही व्यक्ती शत्रू असू शकेल का आणि त्याने सिद्धार्थला पण असंच काही केलं असेल का असे अनेक प्रश्न तिच्या मनात येतात.
वाचा: अशी मी मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी; 'फुलवंती'मधील पहिल्या गाण्याने लावले प्रेक्षकांना वेड

दुसरीकडे तुळजाला कळतं की या बहिणींचा घरामध्ये एक सिक्रेट मोबाईल आहे आणि तो त्यांनी दादा पासून लपवून ठेवलेला आहे. या सिक्रेट गोष्टी मध्ये आता तुळजा सुद्धा सहभागी झालेली आहे. हे दादालाही कळतं की घरामध्ये मोबाईल आहे आणि तो भयंकर चिडतो. त्यावेळी तुळजा बहिणींसाठी उभी राहते. दादाला, तुळजाच म्हणणं पटतं. दुसरीकडे तुळजाकडे पण मोबाईल नाहीये तिला पण मोबाईल लागणार म्हणून दादा मोबाईल घ्यायला शहरात जातो त्यावेळी पहिल्यांदा त्याला सिद्धार्थ नजरेस पडतो. सूर्यादादा आणि सिद्धार्थचा आमना-सामना होईल का? सूर्याच्या जीवाला अजूनही धोका आहे का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्याची उत्तरे मिळणार आहेत.

Whats_app_banner
विभाग