नुकतीच संजय लीला भन्साळी यांची वेब सीरिज 'हीरामंडी' प्रदर्शित झाली आहे. सध्या ही सीरिज तुफान चर्चेत आली आहे. या सीरिजमधील सीन्सची जोरदार चर्चा सुरू आहे. या सीरिजमधील केवळ एक-दोन दृश्ये नाहीत तर अशा अनेक गोष्टी होत्या, ज्यांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे आणि त्यापैकी एक म्हणजे बिब्बोजनचा 'गजगामिनी वॉक'. या व्हिडीओने सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली. अनेक जण या गजगामिनी वॉकची कॉपी करताना दिसत आहेत. आता ‘लापता लेडीज’च्या कलाकारांनी देखील हा गजगामिनी वॉक केला आहे. सोशल मीडियावर हा वॉक खूप चर्चेत आला आहे. यावर स्वतः ‘बिब्बोजान’ म्हणजे अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
लोकांना अदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी वॉक'चे अक्षरशः वेड लागले होते आणि सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा झाली होती. एवढेच नाही तर अनेकांनी यावर व्हिडीओही केले. नुकताच एक लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे, जो 'लापता लेडीज' या चित्रपटातील 'दीपक आणि जया'चा आहे. या दोघांनीही बिब्बोजनची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यावर खुद्द आदिती राव हैदरी हिने प्रतिक्रिया दिली आहे.
नुकताच नेटफ्लिक्सने आपल्या इंस्टाग्रामवर दीपक आणि जया यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये दोघेही धमाल करताना दिसत आहेत. तसेच, या व्हिडीओमध्ये दोघेही बिब्बोजनप्रमाणे'गजगामिनी वॉक' करताना दिसत आहेत. यादरम्यान दोघांच्या हातात एक फूलही दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘काही नाही भाऊ, आम्ही ते फूल शोधायला निघालो आहोत.’ हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, युजर्सही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
अभिनेता स्पर्श श्रीवास्तव आणि अभिनेत्री प्रतिभा रंटा यांच्या या व्हिडीओवर आदिती राव हैदरी हिनेही कमेंट केली आहे. याव्हिडीओवर कमेंट करताना अभिनेत्रीने लिहिले की, ‘बिब्बोजन सर्टिफाइड..खूप छान प्रयत्न केला आहे’. त्याचवेळी एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट केली की, ‘स्पर्शने कमाल केली.’ आणखी एका युजरने म्हटले की, ‘तुम्ही दोघांनीही जादू केली आहे.’ तिसऱ्या वापरकर्त्याने ‘हे काय प्रकरण आहे?’ असे लिहिले. आणखी एक वापरकर्ता म्हणाला की, ‘मजा आली.; युजर्स आता या व्हिडीओवर अशा कमेंट करत आहेत.
संबंधित बातम्या