Vikkas Sethi Death: 'क्योंकि सास भी कभी…' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन-kyunki saas bhi kabhi bahu thi fem vikkas sethi passed away ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vikkas Sethi Death: 'क्योंकि सास भी कभी…' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन

Vikkas Sethi Death: 'क्योंकि सास भी कभी…' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 08, 2024 03:11 PM IST

Vikkas Sethi Passed Away: टीव्ही अभिनेता विकास सेठीचे आज ८ सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या ४८व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Vikkas Sethi
Vikkas Sethi

टीव्ही विश्वातून एक वाईट बातमी येत आहे. टीव्ही अभिनेता विकास सेठीचे आज, ८ सप्टेंब रोजी निधन झाले आहे. विकासने वयाच्या ४८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आता विकासच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. विकासच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

झोपेतच झाला मृत्यू

टेली चक्कर च्या रिपोर्टनुसार, विकास सेठीचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एकता कपूरच्या 'क्यूंकि सास भी कभी बहू' या मालिकेव्यतिरिक्त विकासने स्टार प्लसवरील 'कसौटी जिंदगी की और कहीं तो होगा' या मालिकांमध्ये काम केले होते. विकासच्या पश्चात आता पत्नी आणि जुळी मुले असा परिवार आहे. विकासच्या पत्नीचे नाव जान्हवी सेठी आहे. विकासच्या निधनाबाबत कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

'या' चित्रपटांमध्ये विकास सेठीने केले काम

करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातही विकास सेठी दिसला होता. या चित्रपटात त्याने करीना कपूर खानचा मित्र रॉबीची भूमिका साकारली होती. याशिवाय विकास 'दिवाना पन'मध्येही अभिनेता म्हणून दिसला होता. विकास 2019 मध्ये तेलुगू हिट चित्रपट स्मार्ट शंकरचा ही भाग होता. विकासच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
वाचा: राधिका आपटेची व्हायरल झालेली न्यूड क्लिप ड्रायव्हरने पाहिली अन्...

विकास सेठीची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट

विकासच्या इन्स्टाग्रामवर त्याची शेवटची पोस्ट त्याच्या आईसोबतची आहे. विकासने यावर्षी १२ मे रोजी ही पोस्ट केली होती. १२ मे हा मदर्स डे होता. आईला मदर्स डेच्या शुभेच्छा देताना विकासने ही पोस्ट केली आहे. त्यानंतर त्याने कोणतीही पोस्ट केली नाही. आता विकासचे निधन झाल्याचे कळताच सर्वांना धक्का बसला आहे. त्याची पत्नीला मोठा धक्का बसला असल्याची माहिती समोर येत आहे.

 

Whats_app_banner
विभाग