Kushal Badrike Marriage Post: अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या विनोदवीर कुशल बद्रिकेचे अनेक किस्से नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुशल बद्रिके देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या आयुष्यातील अनेक किस्से सांगत असतो. नुकताच त्याने आपल्या लग्नाचा असाच एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांचा हा किस्सा ऐकून आता सगळ्यांनाच हसू फुटलं आहे. नुकताच कुशलने हा किस्सा त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबतच त्याने आपले काही फोटो शेअर करत, आपल्या लग्नाला सासरहून विरोध झाल्याचे म्हटले आहे.
कुशल बद्रिके याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ही पोस्ट सत्य घटनेवर आधारित आहे. माझ्या लग्नाला तसा माझ्या सासरकडून कडकडून विरोध होता, मला कायम असं वाटत राहील की, माझं दिसणं हेच त्याला कारणीभूत असेल. आता हे फोटोज हाती लागेपर्यंत मी याच “गैर समजुतीत” होतो.’
पुढे तो लिहितो, 'हे फोटोज मला मिळाले त्या क्षणी मी सुनयनाकडे तडक गेलो आणि फोटो दाखवून तिला म्हणालो 'या मुलाला तुम्ही नाकारल होतं, या अशा दिसणाऱ्या मुलाला नाकारण्याची तुमची हिंमत झालीच कशी? सुनयना मला शांतपणे म्हणाली की, ‘तू अजूनही तसाच दिसतोस, हल्ली कॅमेरे बऱ्या क्वालिटीचे आलेत. मग मी आरशात एकदा स्वतःला पाहिलं आणि माझा “गैरसमज” संपूर्ण दूर झाला! खरंच… टेक्नॉलॉजी काय डेव्हलप झाली आहे यार, कॅमेरे चांगले आलेत मार्केटमध्ये..’
अभिनेता कुशल बद्रिके याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही छानसे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कुशल बद्रिके खूप हँडसम दिसत आहे. त्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही पोस्ट लिहिली आहे. कुशलची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहतेच नव्हे, तर कलाकार देखील यावर भरभरून कमेंट्स करत आहे.