झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. त्याने विनोदाच्या अचूक टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्याची लोकप्रियता सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळत आहे. कुशलचे सोशल मीडियावर लाखो असल्याचे दिसते. नुकताच कुशलने केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
कुशल हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याची पत्नी देखील दिसत आहे. पत्नी पुढे चालत आहे. तिच्या मागे कुशल चालत आहे. कुशलच्या हातात खूप सामान दिसत आहे. दरम्यान, त्याच्या पत्नीने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ट्रॅक पँट घातली आहे. तर कुशलने हिरव्या रंगाचा टीशर्ट आणि पँट घातली आहे.
वाचा: अमिताभ बच्चन यांचं शेजारी व्हायचंय? मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड
कुशलने पत्नीसोबतचा हा फोटो शेअर करत 'मागे एका भांडणात ही म्हणाली होती, सगळ्या संसाराचा भार हिने एकटीनेच उचललाय म्हणून' असे कॅप्शन दिले आहे. त्याचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोवर अवधूत गुप्ते, तेजस्वीनी पंडित अशा काही कलाकारांनी हसण्याचा इमोजी वापरुन कमेंट केल्या आहेत. तर एका यूजरने 'अजून तुमच्या बायकोला माहिती नाही तुम्ही पोस्ट केलेला' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'नवरापण भारी देवा' असे म्हटले आहे.
वाचा: ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत
कुशल 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात काम करत होता. पण हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर त्याने हिंदी टेलिव्हिजनकडे आपली वाट सुरु केली आहे. तो सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात दिसत आहे. त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी देखील दिसत आहे. दोघांची जोडी सर्वांना आवडत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या प्रत्येक स्कीटवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. येत्या काळात त्यांचे कोणते स्कीट असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असते.
वाचा: चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कमल हासन यांच्या लेकीचा ब्रेकअप, काय आहे कारण?