TMKOC : कुछ तो लोग कहेंगे... ‘जेठालाल’सोबत झालेल्या वादावर ‘तारक मेहता’चे निर्माते असित मोदी काय म्हणाले?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC : कुछ तो लोग कहेंगे... ‘जेठालाल’सोबत झालेल्या वादावर ‘तारक मेहता’चे निर्माते असित मोदी काय म्हणाले?

TMKOC : कुछ तो लोग कहेंगे... ‘जेठालाल’सोबत झालेल्या वादावर ‘तारक मेहता’चे निर्माते असित मोदी काय म्हणाले?

Nov 24, 2024 08:49 AM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहका का उल्टा चष्मा’ या शोच्या सेटवर दिलीप जोशी आणि निर्माता असित मोदी यांच्यात जोरदार वाद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

दिलीप जोशी
दिलीप जोशी

Asit Modi on Clashes With Jethalal : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमाबाबत नेहमीच काही ना काही वाद होतात. कधी एखादा स्टार शो सोडतो, तर कधी कोणी शोच्या निर्मात्यावर गंभीर आरोप करतो. नुकतीच अशी बातमी आली होती की, शोचा लीड ॲक्टर दिलीप जोशी आणि प्रोड्युसर असित मोदी यांच्यात सुट्ट्यांबाबत वाद झाला होता. प्रकरण इतके वाढले होते की'जेठालाल'म्हणजेच दिलीप जोशी यांनी असितची कॉलर पकडली होती. मात्र,यात किती तथ्य आहे आणि किती नाही,याबाबत तूर्तास काही सांगता येणार नाही. पण आता असितने शोच्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले असित मोदी वादावर?

'व्हायरल भयानी'सोबतच्या खास संभाषणात,जेव्हा असित मोदींना विचारण्यात आले की, शोमधील वादाचा ते कसा सामना करतात. या प्रश्नाचे उत्तर देताना निर्मात्याने सांगितले की, तो फारसे लक्ष देत नाही. असित मोदी म्हणाले, की 'यश मिळाले की लोक काही ना काही बोलतात. हा आमच्या कामाचा एक भाग आहे आणि माझे काम'तारक मेहता का उल्टा चष्मा'वर लक्ष केंद्रित करणे आहे. दररोज नवीन कथा तयार करण्यावर आहे. आमच्या प्रेक्षकांना आनंदी ठेवणंहेच आमचं काम आहे.'

TMKOC : ‘जेठालाल’ने का पकडली असित मोदीची कॉलर? शो सोडण्याची धमकीही दिली! ‘तारक मेहता...’चे वाद चव्हाट्यावर

दिलीप जोशींसोबतच्या वादाचं काय झालं?

मीडिया रिपोर्ट्स नुसार, दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्या वादाचं हे संपूर्ण प्रकरण यावर्षी ऑगस्टच्या सुरुवातीला घडले. ही मारामारी फी किंवा पैशांमुळे झाली नसून सुट्ट्यांमुळे झाल्याचे वृत्त आहे. रजेवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. शोच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार,दिलीप म्हणजेच जेठालाल यांनी असित मोदी यांना शोमधून काही दिवस सुट्टी घेण्याबाबात विचारणा केली होती. परंतु निर्मात्याने त्यावर कोणतीही ठोस चर्चा केली नाही आणि तो चर्चा सतत टाळत राहिला. त्यामुळे जेठालालला राग आला आणि दोघांमध्ये बाचाबाचीही झाल्याची माहिती आहे.

हाँगकाँगच्या शूटिंगदरम्यानही झाली होती हाणामारी!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तर याआधीही दोघांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. हाँगकाँगमध्ये शोच्या शूटिंगदरम्यानही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते, पण त्यावेळी गुरुचरण सिंह सोढी यांनी मध्यस्थी करून दोघांमध्ये समेट घडवून आणल्याचे म्हटले जात आहे.

Whats_app_banner