Krystyna Pyszkova: ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा ९ मार्च रोजी भारतात पार पडला. जवळपास २८ वर्षांनंतर मिस वर्ल्ड हा कार्यक्रम भारतात आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्झेत चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा हिने ‘मिस वर्ल्ड २०२४’चा किताब स्वत:च्या नावे केला. सर्वांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पण या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सिनी शेट्टी कोणत्या क्रमांकावर पोहोचली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
‘मिस वर्ल्ड २०२४’च्या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी १२ सदस्यांकडे होती. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, बँकर, गायिका व समाजसेविका अमृता फडणवीस, चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, पत्रकार रजत शर्मा, बेनेट, कोलमन अँड को. लिमिटेडचे डिरेक्टर विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेअरमन आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर, हॉस्ट जामिल सैदी यांचा समावेश होता. याशिवाय पूर्वाश्रमीच्या ३ ‘मिस वर्ल्ड’ विजेत्या देखील यात होत्या. ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करण जोहर व ब्यूटी क्वीन मेगन यांग यांनी केलं. तसंच या सोहळ्यात शान, नेहा कक्कर, टोनी कक्कर परफॉर्म केले.
वाचा: प्रियांका चोप्राची बहीण होणार केजरीवालांची सून होणार; लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा
‘मिस वर्ल्ड २०२४’च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सिनी शेट्टी ही टॉप-८ पर्यंत पोहोचू शकली. ती टॉप-४च्या शर्यतीतून बाहेर झाली. पण सिनीने टॉप ४ पर्यंत खूप सुंदर प्रदर्शन केले. सर्वांच्या मनात सिनीची एक वेगळी अशी ओळख निर्माण झाली.
वाचा: तो डुकरासारखा खातो… सलमानविषयी अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा
सिनी शेट्टीच्या कुटुंबाची नाळ कर्नाटकाशी जोडली असली तरी तिचा जन्म २ ऑगस्ट २००१ साली मुंबईत झाला होता. सिनीची आजी राजघराण्यातली आणि आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. तिच्या वडिलांचे नाव सदानंद शेट्टी असून आईचे नाव हेमा शेट्टी असे आहे. तिला एक भाऊ देखील आहे. ज्याचे नाव शिकिन शेट्टी आहे. सिनीचे वडील हॉटेल व्यवसायात आहेत.
यावेळी ११५ देशांच्या सुंदरींनी स्पर्धेत सहभाग घेतला. मिस वर्ल्ड २०२४ च्या ग्रँड फिनाले इव्हेंटचे आयोजन करण्याची संधी भारताला २८ वर्षानंतर मिळाली होती. भारताने १९९६ मध्ये शेवटची मिस वर्ल्ड स्पर्धेचे यजमानपद भुषविले होते.
संबंधित बातम्या