बॉलिवूड कलाकार कधी कोणाशी लग्न करतील, कधी कोणाला डेट करतील याबाबत कोणीही काही सांगू शकत नाही. बॉलिवूडमधील एक कपल असे आहे ज्यांची लव्हस्टोर वन नाईट स्टँडपासून सुरु झाली. या कपलची लव्हस्टोरी २००६ साली सुरु झाली. या अभिनेत्रीने शाहरुख खान आणि जॅकी श्रॉफसोबत काम केले होते. त्याच काळात हा अभिनेता इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. या कपलमध्ये जवळपास १० वर्षांचे अंतर आहे. ओळखलंत का या कपलला? नाही ना चला मग जाणून घेऊया...
या जोडीमधील अभिनेत्री ही अभिनेत्या पेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. तसेच घटस्फोटीत देखील आहे. पण, आज या कपलच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना पाहून अनेकजण कपल गोल असे देखील म्हणतात. या जोडीचे नाव आहे अभिनेता कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी बोलताना कृष्णा म्हणाली की, 'कश्मीरा शाहरुख खान आणि जॅकी श्रॉफसोबत काम करणारी हॉट, सेक्सी आणि प्रसिद्ध अभिनेत्री होती. तेव्हा मी नवोदित होते. आमच्या वयातील अंतराचा मला जराही फरक पडला नाही. मी तिला भेटलो, मला ती आवडली, मी तिच्याशी वाइब मॅच केली, एवढंच.'
पुढे कृष्णा म्हणाला, "काश्मीरा माझी गर्लफ्रेंड आहे हे लोकांना सांगताना मला खूप मजा यायची. मी लोकांना म्हणायचो, बघा मी कश्मीरा शाहला डेट करत आहे. ’… जयपूरमध्ये उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवर आमची भेट झाली. हळूहळू आमची मैत्री झाली आणि मग एके दिवशी काश्मीराने मला जेवायला बोलावले आणि अशाप्रकारे आमचे नाते सुरू झाले... वन नाईट स्टँडपासून..." त्यानंतर कृष्णा अभिषेक हसू लागला.
वाचा: बॉलिवूडमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा यूट्यूबवर प्रदर्शित! बजेट ४५ कोटी आणि कमाई ०.०१ कोटी
सध्या कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा हे कॉमेडियन भारती सिंहच्या 'लाफ्टर शेफ' या कार्यक्रमात दिसत आहेत. दोघेही एकत्र जेवण बनवताना दिसतात. या कार्यक्रमात अंकिता लोखंडे, विकी जैन, अर्जुन बिजलानी, करण कुंद्रा, अली गोणी, राहुल वैद्य, निया शर्मा आणि इतर काही स्पर्धक दिसत आहेत. या कार्यक्रमात कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करताना दिसत आहेत.