बॉलिवूडमधील सर्वात उंच अभिनेत्री म्हणून क्रिती सेनॉन ओळखली जाते. आज २७ जुलै रोजी क्रितीचा ३४वा वाढदिवस आहे. ती कुटुंबीयांसोबत तिचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे म्हटले जात आहे. करिअरच्या सुरुवातीला क्रितीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये काम करण्यास आली. पण दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत असताना क्रिती बॉलिवूडमध्ये कशी आली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
क्रितीचा जन्म २७ जुलै १९९० रोजी नवी दिल्लीत झाला. मनोरंजन विश्वाशी संबंधित नसतानाही क्रिती सेनॉन आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. क्रितीने तिच्या दमदार अभिनयाने फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रिती सेनॉनला तिच्या अभिनयासोबतच स्टाईलसाठीही चांगलीच पसंती दिली जाते. ‘हिरोपंती’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले, तरी ती आधीपासूनच मनोरंजन विश्वात सक्रिय होती.
अभिनेत्री क्रिती सेनॉनचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. तिचे वडील राहुल सेनॉन हे सीए आहेत. तर, तिची आई गीता सेनॉन दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. इतकंच नाही, तर क्रितीने स्वतः इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तिने नोएडा येथील कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. क्रिती सेनॉन एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना देखील आहे. केवळ नृत्यचे नाही तर, क्रिती राज्यस्तरीय बॉक्सर देखील आहे. पण, नंतर तिने अचानक फिल्मी दुनियेत एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला.
क्रिती सेनॉनने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत केली होती. त्यांचा पहिला चित्रपट होता तेलुगू सायकोलॉजिकल थ्रिलर 'नेनोक्कडाइन'. या चित्रपटासाठी क्रिती सेनॉनचे खूप कौतुक झाले. पण या चित्रपटातून तिला फारशी ओळख मिळू शकली नाही. यानंतर क्रिती सेनन शब्बीर खानच्या 'हिरोपंती'मध्ये टायगर श्रॉफसोबत झळकली. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. ‘हिरोपंती’ हा चित्रपट हिट झाला आणि क्रिती सेनॉनला मनोरंजन विश्वात चांगली ओळख मिळाली. यानंतर ती बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
वाचा: 'माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं', बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती वडिलांची प्रतिक्रिया
क्रितीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिला तिच्या पहिल्या रॅम्प वॉकदरम्यान झालेल्या चुकीमुळे खूप काही सहन करावे लागले होते. त्यावेळी अभिनेत्री चक्क रॅम्पवरच रडली होती. तिने तिचा पहिला रॅम्प शो केला तेव्हा, कोरिओग्राफीमध्ये काही गडबड झाली होती. यामुळे कोरिओग्राफर तिच्यावर प्रचंड चिडला. २० मॉडेल्ससमोर तिला खूप ऐकून घ्यावे लागले होते.
संबंधित बातम्या