मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kriti-Pulkit Wedding Card: सलमान खानचा एक्स भावोजी अडकणार लग्न बंधनात! पुलकित-क्रितीच्या लग्नाची पत्रिका झाली लीक

Kriti-Pulkit Wedding Card: सलमान खानचा एक्स भावोजी अडकणार लग्न बंधनात! पुलकित-क्रितीच्या लग्नाची पत्रिका झाली लीक

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 06, 2024 11:07 AM IST

Kriti Kharbanda Pulkit Samrat Wedding Card: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांची ही लग्नपत्रिका ॲनिमेशनवर आधारित आहे.

Kriti Kharbanda Pulkit Samrat Wedding Card
Kriti Kharbanda Pulkit Samrat Wedding Card

Kriti Kharbanda-Pulkit Samrat Wedding Card: ‘फुकरे’ अभिनेता पुलकित सम्राट सध्या त्याच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अभिनेता पुलकित सम्राट बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री क्रिती खरबंदा हिला डेट करत आहे. दोघांमध्ये हे प्रेमाचे नाते आता आणखी एक पाऊल पुढे जाणार आहे. नुकतेच या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर लीक झाली आहे. या लग्न पत्रिकेची झलक पाहिल्यानंतर दोघेही लग्नासाठी जय्यत तयारी सुरु केल्याचे लक्षात येत आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होत असून, लोकांना देखील ती खूप आवडली आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका अगदीच हटके आहे.

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांची ही लग्नपत्रिका ॲनिमेशनवर आधारित आहे, ज्यामध्ये एक मुलगा बाल्कनीत गिटार घेऊन बसलेला दिसत आहे. तर, तिथे त्याच्यासोबत एक मुलगीही बसलेली दिसत आहे. दोघेही एकत्र समुद्राकडे बघत आहेत. त्या दोघांसोबत दोन कुत्रेही त्यात दिसत आहेत. त्यावर कॅप्शनही लिहिलेय की, 'माझ्या मित्रांसोबत हा खास क्षण सेलिब्रेट करण्यासाठी आता आणखी फारकाळ वाट पाहू शकत नाही. लव, पुलकित आणि कृती'. सोशल मीडियावर व्हायरल झालेली लग्न पत्रिका पाहिल्यानंतर चाहते या जोडीचे अभिनंदन करत आहेत. यावर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, 'आता आम्ही देखील फार वाट बघू शकत नाहीये.' आणखी एकाने लिहिले की, 'तुमचे खूप खूप अभिनंदन, हे कार्ड खूप सुंदर आहे.' मीडिया रिपोर्टनुसार दोघे १३ मार्चला लग्न करणार आहेत.

Anant Ambani Pre Wedding: रिहाना ते जॉन लीजेंड; अंबानींच्या कार्यक्रमासाठी परदेशी कलाकारांनी घेतले ‘इतके’ मानधन

एंगेजमेंटचे फोटो झाले व्हायरल!

अभिनेता पुलकित सम्राट बऱ्याच वर्षांपासून क्रिती खरबंदाला डेट करत आहे. या दोघांनीही खूप आधीच आपले प्रेम जगजाहीर केले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या एंगेजमेंटच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यात क्रिती खरबंदा आणि पुलकितचे कुटुंब एकत्र दिसले होते आणि या दरम्यान समोर आलेल्या फोटोंमध्ये क्रिती तिची अंगठी फ्लाँट करताना दिसत होती. पुलकित सम्राटच्या बहिणीने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कधी करणार लग्न?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रिकेत दोघेही मार्चमध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप तरी या दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. आता लग्नपत्रिकेची झलक व्हायरल होऊ लागली आहे, ज्यानंतर त्यांचे चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत. अभिनेता पुलकित सम्राटचे हे दुसरे लग्न असणार आहे. यापूर्वी २०१४मध्ये पुलकितने गर्लफ्रेंड श्वेता रोहिरासोबत लग्न केले होते. श्वेता रोहिरा ही सलमान खानची बहिण आहे. मात्र, पुलकित आणि श्वेता यांनी २०१५ घटस्फोट घेतला.

IPL_Entry_Point

विभाग